harmanpreet need dropped from indian team Diana Edulji sakal
क्रीडा

हरमनप्रीतला महिला संघातून वगळा ; डायना एडल्जी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कधी काळी केलेल्या एका खेळीच्या जोरावर किती दिवस संघात स्थान टिकवून ठेवणार? सातत्याने अपयशी ठरत असलेल्या हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांना आता वगळावे, असे स्पष्ट मत माजी महिला कर्णधार डायना एडल्जी यांनी व्यक्त केले आहे.

महिला वर्ल्डकपची तयारी आणि अनुभव यासाठी भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पहिले दोन सामने गमावले आहेत. आता तिसऱ्या सामन्यासाठी हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा यांनी संघातून बाहेर काढावे, असे एडल्जी यांचे म्हणणे आहे. २०१७ मधील विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीत कौरने १७१ धावांची खेळी केली होती. त्या डावानंतर तिने दोनदाच अर्धशतकी खेळी केलेली आहे.

स्मृतीकडे सर्व प्रकाचे नेतृत्व द्या!

स्मृती तिन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून योग्य आहे. मिताली कसोटी आणि एकदिवसीय; तर हरमनप्रीत ट्वेन-२० प्रकारांत कर्णधार आहे, परंतु स्मृतीची तिन्ही प्रकारांसाठी कर्णधार नियुक्त करण्याची वेळ आली आहे, असेही एडल्जी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT