harmanpreet Singh leads Men hockey team Sakal
क्रीडा

Paris Olympics : हरमनप्रीतकडे हॉकी संघाचे नेतृत्व; पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय संघाची घोषणा

harmanpreet Singh leads Men hockey team : भारतीय हॉकी संघ सध्या बंगळूर पॅरिस ऑलिंपिकची तयारी करीत आहे. पी. आर. श्रीजेश, मनप्रीत सिंग यांचे हे चौथे ऑलिंपिक असणार आहे, तसेच कर्णधार हरमनप्रीत सिंग तिसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये ऐतिहासिक ब्राँझपदक पटकावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाची आगामी पॅरिस ऑलिंपिकसाठी घोषणा बुधवारी करण्यात आली. अनुभवी खेळाडू हरमनप्रीत सिंग याच्याकडे भारतीय हॉकी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हार्दिक सिंग हा भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार असणार आहे.

भारतीय हॉकी संघ सध्या बंगळूर पॅरिस ऑलिंपिकची तयारी करीत आहे. पी. आर. श्रीजेश, मनप्रीत सिंग यांचे हे चौथे ऑलिंपिक असणार आहे, तसेच कर्णधार हरमनप्रीत सिंग तिसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहे. रुपेंदरपाल सिंग व बिरेंद्र लाक्रा हे खेळाडू निवृत्त झाले आहेत.

भारतीय हॉकी संघ

गोलरक्षक - श्रीजेश पी. आर. बचावपटू - जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, सुमीत, संजय. मधली फळी - राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद. आक्रमक फळी - अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुर्जंत सिंग. पर्यायी खेळाडू - नीलकांता शर्मा, जुगराज सिंग, क्रिशन बहादूर पाठक.

पाच खेळाडू पहिल्यांदाच खेळणार

भारताच्या हॉकी संघातील पाच खेळाडू पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये जरमनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक व सुखजित सिंग या पाच खेळाडूंचा समावेश आहे.

बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिनाशी लढणार

भारतीय हॉकी संघाचा ‘ब’ गटात समावेश आहे. या गटात गतविजेते बेल्जियम, ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना या बलाढ्य संघांचा समावेश आहे, तसेच न्यूझीलंड व आयर्लंड हे देशही याच गटात खेळणार आहेत. ‘अ’ गटामध्ये नेदरलँड्‌स, जर्मनी, ग्रेटब्रिटन, स्पेन, फ्रान्स व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये चढाओढ लागणार आहे.

पॅरिस ऑलिंपिकमधील हॉकी स्पर्धेची गटवारी

अ - नेदरलँड्‌स, जर्मनी, ग्रेटब्रिटन, स्पेन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका

ब - बेल्जियम, भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, आयर्लंड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

मिस पुणे ते कॉर्पोरेट कंपनीत सिनियर मॅनेजर; लग्नानंतर ५ महिन्यात मृत्यूने खळबळ, कोण होती ट्विशा?

SCROLL FOR NEXT