Harry Brook Sakal
क्रीडा

Harry Brook : इंग्लंडच्या ब्रूकने तोडला विनोद कांबळीचा 30 वर्ष जुना विक्रम!

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली.

सकाळ डिजिटल टीम

Harry Brook : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विल्मिंग्टन येथे खेळला जात आहे.

या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने आपल्या झंझावाती कामगिरीच्या जोरावर भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा वर्षानुवर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

ब्रूकने कारकिर्दीच्या सुरुवातीला 9 कसोटी डावांत 800 हून अधिक धावा केल्या आहेत. अशाप्रकारे विक्रम करणारा ब्रूक पहिला खेळाडू ठरला आहे.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर चेक क्रोली अवघ्या 2 धावा करून बाद झाला. यानंतर बेन डकेटने 9 धावा केल्या.

ओली पॉप 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. मात्र जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी शानदार प्रदर्शन करत सामन्याचं चित्रचं बदलून टाकलं.

हॅरी ब्रूक हा आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी डावात 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 9 डावात 4 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. यासह 807 धावा झाल्या आहेत.

ब्रूकच्या आधी हा विक्रम कांबळीच्या नावावर होता. त्याने 9 कसोटी डावांमध्ये सर्वाधिक 798 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार शतके आणि दोन द्विशतके झळकावली होती.

ब्रूकने 800 हून अधिक धावा करून अनेक दिग्गजांना मागे सोडले असून, या यादीत सुनील गावस्कर यांच्या नावाचाही समावेश आहे. गावस्कर यांनी 9 डावात 778 धावा केल्या आहेत. तर, एव्हर्टन वीक्सने 9 डावात 777 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बिपिन बाफना खून प्रकरणी आरोपींना ३० वर्षांचा कारावास, हायकोर्टाकडून फाशीची शिक्षा रूपांतरित

डायबिटीज पेशंट्ससाठी Good News! आता आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावं लागणार इन्सुलिन इंजेक्शन; भारतात आलं नवं इन्सुलिन

Latest Marathi News Live Update : ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी न्यूझीलंडकडे रवाना

Pune Metro Record Ridership : आषाढी वारीत पुणे मेट्रोचा नवा विक्रम; एकाच दिवशी तब्बल ३.५२ लाख प्रवाशांनी केला प्रवास

Mumbai–Pune Trains: मुंबई-पुणे मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द; मात्र 'या' दोन एक्स्प्रेस सुरू, पुणे रेल्वे स्थानकाकडून माहिती

SCROLL FOR NEXT