Harsha Bhogle  ESAKAL
क्रीडा

Harsha Bhogle : कायम छोटेच रहा... हर्षा भोगले यांनी पाकिस्तानच्या खोडसाळ फॅनला दिलं 'कडक' उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Harsha Bhogle : वनडे वर्ल्डकपमध्ये साधं साखळी फेरी पार करू न शकलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या एका चाहत्याला सोशल मीडियावर भारतीय संघाला ट्रोल करण्याची खुमखुमी आली होती. मात्र ही खुमखुमी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगलेंनी या क्रिकेट चाहत्याची बोलतीच बंद केली.

फारूख खान नावाच्या एका पाकिस्तानी चाहत्यानं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 2020 - 21 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्याने याला एक खोचक कॅप्शन दिले होते. तो लिहितो की, 'जर तुमचा दिवस खराब जात असेल तर ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाजीचा कसा अपमान केला होता याचा आनंद घ्या.'

भारतीय संघाची त्या कसोटी मालिकेत खूप खराब सुरूवात झाली होती. पहिल्या कसोटीत भारतीय संघ 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. ही कसोटी क्रिकेटमधील एका डावातील सर्वात निच्चांकी धावसंख्या होती.' दरम्यान, हर्षा भोगले यांनी या फारूख खानला प्रतिक्रिया दिली.

हर्षा भोगलेंनी ट्विट केले की, 'फारूख तू हा व्हिडिओ टाकलास अन् मला आनंद झाला. कारण यामुळेच आम्ही कसोटीत ऐतिहासिक कामगिरी करू शकलो. तुम्ही अडचणी अन् विपरित परिस्थितीवर मात करत धाडस, जबरदस्त नेतृत्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी सामना जिंकवणारी कामगिरी करू शकता याचं हे उत्तम उदाहरण आहे. ज्यावेळी तुमच्याकडे तो अभिमान असेल त्याचवेळी तुम्ही नवी उंची गाठू शकता.'

'ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याच्या विपरित परिस्थितीत स्वतःचा आनंद शोधता. त्यावेळी तुम्ही छोटेच आणि केविलवाणे राहता. त्यामुळे जरा मोठा विचार करा, दर्जेदार विचार करा, तुम्हाला चांगलं जग दिसेल. आशा आहे की...'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: 38 व्या वर्षीच नोकरीला रामराम! वर्षाला 2 कोटी कमावणाऱ्या इंजिनिअरने उघडलं साइड कमाईचं सीक्रेट

संजय कपूर अन् शाहीरच्या सूडाचा खेळ; 'अब होगा हिसाब २' चा ट्रेलर आऊट

Cancer Care: राज्य कर्करोग संस्थेत अत्याधुनिक पेट-सीटी स्कॅन सेवा सुरू; मराठवाड्यातील कर्करोग रुग्णांना मोफत व परवडणाऱ्या निदानाचा मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : जळगावात प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जन्य साठ्यावर कारवाई

Kidney Patient: माणुसकीचा सुंदर आविष्कार! किडनीग्रस्त सहकाऱ्याच्या मदतीला धावले शिलेदार, कर्जतमध्ये माणुसकीचा प्रेरणादायी आदर्श

SCROLL FOR NEXT