Hassan Ali and his Indian fiancee do a pre wedding photo shoot in Dubai 
क्रीडा

भारताच्या नव्या पाकिस्तानी जावयाचे दुबईत फोटोशूट

वृत्तसंस्था

दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि हरियाणातील शामिया खान हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी दुबईमध्ये खास फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. हसन अलीनं 2013मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017च्या चॅम्पियन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता. हसन अलीच्या नावावर 50 एकदिवसीय विकेट आहेत. हसन अली शेवटचा सामना वर्ल्ड कपमध्ये भारताविरोधात खेळला होता. 

शामिया परिवारातील 10 सदस्य 17 ऑगस्टला दुबईला रवाना होणार आहेत.  "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले," असे मत शामियाचे वडील, लियाकत अलींने व्यक्त केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT