क्रीडा

Heath Streak Virender Sehwag : आनंद झाला, यमराजजींनी... हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या वृत्तावर सेहवागने काढला चिमटा

अनिरुद्ध संकपाळ

Heath Streak Virender Sehwag : आज क्रिकेट चाहत्यांची सकाळ ही झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या बातमीने झाली. मात्र झिम्बाब्वेच्याच माजी वेगवान गोलंदाज हेंन्री ओलंगाने स्ट्रीक हा जिवंत असल्यांचे सांगत बातमी खोटी असल्याचे सिद्ध केले. त्याने ट्विट करत हीथ स्ट्रीक हा जिवंत असल्याचे सांगितले. ओलंगाने केलेल्या ट्विटमुळे खूप गोंधळ निर्माण झाला होता.

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार स्ट्रीक हा गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रस्त आहे. तो सध्या उपचार घेत आहे. ओलंगाने ट्विटरवर हीथ स्ट्रीकसोबतच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स शेअऱ केले. त्याला त्याने गंमतीने कॅप्शन दिले की थर्ड अंपायरने त्याला माघारी बोलवले. आता यावर विरेंद्र सेहवागनेही प्रतिक्रिया दिली आहे.

ओलंगाने स्ट्रीकसोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, 'मी हे खात्रीने सांगू शकतो की हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी खूपच वाढवून सांगण्यात आली आहे. मी आताच खुद्द त्याच्याकडूनच ऐकलं आहे, तिसऱ्या अंपायरने त्याला माघारी बोलवलं आहे. लोकांनो ते अजून जिवंत आहे.'

ओलंगाच्या या ट्विटवर विरेंद्र सेहवागने देखील प्रतिक्रिया दिली. हीथ स्ट्रीक जिवंत असल्यांचे समजल्यानंतर तो म्हणाला की, 'यमराजजींनी अपिल नाकारली आहे. हीथ स्ट्रीक तू स्वतःच हे सांगितलंस त्याबद्दल आभार.'

यापूर्वी आपल्या निधनाची खोटी बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरल्याचे समजताच हीथ स्ट्रीकने नाराजी व्यक्त केली होती. त्याने सूत्रांनी माफी मागावी अशी देखील मागणी केली आहे.

मीड डे वर्तमानपत्राशी बोलताना स्ट्रीक म्हणाला की, 'आजच्या सोशल मीडियाच्या काळात एखाद्याच्या निधनासारखी मोठी आणि फेक बातमी वाऱ्यासारखी पसरू शकते हे पाहून खूप दुःखी झालो आहे.'

स्ट्रीकने 2005 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तो झिम्बाब्वेकडून 100 पेक्षा जास्त कसोटी आणि 200 पेक्षा जास्त वनडे विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT