Ganesh Chaturthi 2023 
क्रीडा

Ganesh Chaturthi 2023 : रोहित-विराटसह 'या' खेळाडूंच्या घरी बाप्पाचे आगमन, फोटो अन् व्हिडिओ व्हायरल… पाहा झलक

Kiran Mahanavar

These cricketers established Ganesh : देशात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बॉलिवूड स्टार्स आणि राजकारण्यांच्या घरी गणेशजींचे आगमन झाले आहे.

दरम्यान, क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. कर्णधार रोहित शर्मा असो किंवा भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आले आहेत. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येकाने सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही गणेशजींचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. त्याचा व्हिडिओ सचिनने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर गणेशाची पूजा करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना रोहितने कॅप्शनमध्ये लिहिले - गणपती बाप्पा मोरया!

भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत गणेशाची पूजा केली. अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत ती पती विराट कोहलीसोबत गणेशाची पूजा करताना दिसत आहे. पहिल्या फोटोत गणपती आहे. फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

अनुभवी गोलंदाज युजवेंद्र चहलनेही देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर गणपतीचा फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! गणपती आपल्याला अपार सुख आणि समृद्धी देवो. गणपती बाप्पा मोरया!”

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही आपल्या घरी बाप्पाचे स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. दरम्यान, सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली असून त्यात त्याने मंत्र लिहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT