Chess World Cup Final 2023 R Praggnanandhaa  esakal
क्रीडा

Chess World Cup Final 2023 : दुसरा गेम देखील झाला ड्रॉ, प्रग्नानंदचा 'विश्वविजय' लांबणीवर

अनिरुद्ध संकपाळ

Chess World Cup Final 2023 R Praggnanandhaa : अझरबैजान येथील बाकूमध्ये भारताच्या आर. प्रग्नान आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात सुरू असलेल्या बुद्धीबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यातील दुसरा गेम देखील ड्रॉ झाला. त्यामुळे आता बुद्धीबळाचा नवा विश्वविजेता उद्या टाय ब्रेकर गेममध्ये ठरणार आहे.

प्रग्नानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील फायनल सामन्यातील काल झालेला पहिला गेम हा ड्रॉ झाला होता. दुसऱ्या गेममध्ये जो आघाडी घेईल तो विश्वविजेता ठरणार होता. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पांढरी प्यादी घेऊन खेळणारा कार्लसन हा सुरूवातीपासूनच बचावात्मक खेळ करत होता. याचवेळी तो ड्रॉसाठीच खेळतोय याची जाणीव झाली आहे.

मात्र भारताचा 18 वर्षाचा स्टार बुद्धीबळपटू प्रग्नानंदने आक्रमक चाली रचण्यास सुरूवात केली. तो प्याद्यांच्या बाबतीत देखील कार्लसनच्या पुढे होता. मात्र 21 चालीनंतर प्रग्नानंद वेळेच्या मागे पडला.

प्रग्नानंदच्या घडाळ्यात 1 तास 2 मिनिटे झाली होती. तर कार्लसनच्या घड्याळात 1 तास 14 मिनिटे झाली होती. हा गेममधील खूप नाजूक क्षण होता. गेम हा ड्रॉच्या दिशने जात होता.

जवळपास एक तास आक्रमकपणे सरू असलेल्या सामन्यानंतर प्रग्नानंद आणि मॅग्नस कार्लसन यांनी दुसरा गेम हा ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला. आता बुद्धीबळाच्या पटाचा विश्वविजेता कोण होणार हे उद्या (दि. 24) टाय ब्रेकरवर ठरणार आहे.

कार्लसनने पहिल्यापासूनच गेम ड्रॉ करण्याच्या दृष्टीने चाली रचल्या. समालोचकांनी सांगितल्या प्रमाणे कार्लसन ही रणनिती अवलंबली कारण तो फूड पॉइजनिंग झालं होतं. तो अंतिम सामना तिसऱ्या दिवशी घेऊन जाऊ इच्छित होता. कारण त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून वेळ मिळेल.

विशेष म्हणजे कार्लसन हा जरी सध्या जगातिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असला तरी त्याला एकादाही चेस वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. तसेच प्रग्नानंद देखील पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे उद्या नवा बुद्धीबळ विश्वाला विश्वविजेता मिळणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT