History of Maharashtra Kesari Gada 
क्रीडा

महाराष्ट्र केसरी 2020 : जाणून घ्या मानाच्या गदेचा इतिहास

सागर आव्हाड

पुणे : महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी मोहोळ यांच्या घरी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी खासदार अशोक मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले यावेळी माजी खासदार नानासाहेब नवले व मुळशी तालुक्यातील मल्ल उपस्थित होते महाराष्ट्र केसरी कुस्तीला आजपासून सुरुवात होत आहे.

महाराष्ट्र केसरीच्या गदेचा ऐतिहासिक वारसा
महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.

गदेची रचना
महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच असून, व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. वजन 8 ते 10 किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते  मागील 36 वर्षांपासून पंगांठी  कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

Oracle layoffs : AI मुळे नोकऱ्यांवर गंडांतर? सर्वात मोठ्या IT कंपनीने एका झटक्यात ३०००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने खळबळ

Jalna News: अवकाळी पावसामुळे द्राक्षांना बसला फटका; काढणीला आलेल्या मण्यांना तडे, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

Students Drowning: तीन शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू; घोडेगावातील घटना,नातेवाईकांची घटनास्थळी धाव, मृतदेह बाहेर काढताच फोडला टाहो..

SCROLL FOR NEXT