elena norman sakal
क्रीडा

Elena Norman : हॉकी इंडियात काम करताना कोंडी; एलिना नॉर्मन यांनी सीईओ पद सोडले

एलिना नॉर्मन या महिला व्यक्तीने तब्बल १३ वर्षांनंतर हॉकी इंडियातील सीईओ अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - एलिना नॉर्मन या महिला व्यक्तीने तब्बल १३ वर्षांनंतर हॉकी इंडियातील सीईओ अर्थातच मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. हॉकी इंडियात काम करताना त्यांची कोंडी होत होती. त्यांना गुदमरल्यासारखे वाटत होते. याच कारणामुळे एलिना नॉर्मन यांनी मंगळवारी माघार घेण्याचे ठरवले.

एलिना नॉर्मन या मूळच्या ऑस्ट्रेलियाच्या. त्या २०११ मध्ये हॉकी इंडियाशी जोडल्या गेल्या होत्या. याप्रसंगी त्या म्हणाल्या, हॉकी इंडियामध्ये दोन गट तयार झाले होते. अध्यक्ष दिलीप तिर्की यांचा एक गट आणि सचिव भोलानाथ सिंग, कार्यकारी संचालक आर. के. श्रीवास्तव व खजिनदार सेकर मनोहरन यांचा एक गट.

हॉकी इंडियातील काही व्यक्तींना सत्ता हवी होती; पण दिलीप तिर्की यांना भारतातील हॉकी या खेळाला मोठे करायचे होते. मीही दिलीप तिर्की यांच्या बाजूनेच होती. मागील तीन महिन्यांपासून माझे मानधनही देण्यात आले नव्हते. त्यांना समजावून सांगण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात शिल्लक मानधन देण्यात आले.

एलिना नॉर्मन पुढे म्हणाल्या, दिलीप तिर्की यांनी हॉकी खेळाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. मात्र, बिजू जनता दल या पक्षासाठी काम करीत असल्यामुळे त्यांना हॉकी इंडियासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. तसेच आगामी काळात लोकसभा निवडणूक असल्यामुळे त्यांना तेथे लक्ष द्यावे लागत आहे. पद सोडण्याचा निर्णय मी दिलीप तिर्की यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना कळवला होता.

यानेक शॉपमन यांचाही राजीनामा

गेल्या काही दिवसांमध्ये कामकाजावर नाराज होऊन राजीनामा देणाऱ्या व्यक्तींची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षिका यानेक शॉपमन यांनीही हॉकी इंडियामध्ये वातावरण योग्य नसल्याचे स्पष्ट करीत राजीनामा दिला होता. आता एलिना नॉर्मन यांनीही तेच कारण पुढे केले आहे.

सीईओ पद सोडल्यानंतर आता मी विश्रांती घेणार आहे. मासेमारी, ट्रेकींग हे छंद जोपासणार आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहे. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नव्या संधीचा शोध घेईन. भविष्यात माझ्यासाठी काय लिहून ठेवले आहे हे माहीत नाही; पण नक्कीच काहीतरी चांगले असावे.

- एलिना नॉर्मन, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, हॉकी इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहतूक पोलिसाची दुचाकीस्वाराला शिवीगाळ! ‘एसीपी’ म्हणाले, वाहतूक पोलिसांना दिले जाणार चांगले वागण्याचे धडे; सहायक पोलिस आयुक्तांची झाली आदलाबदली

Ragi Ghavan: ग्लूटेन-फ्री नाश्ता हवाय? मग ही नाचणीच्या घावणाची रेसिपी नक्की ट्राय करा

Horoscope: पैशांच्या बाबतीत नशीबवान असतात ‘या’ 5 राशी; कमाईसोबत पैसा टिकवण्यातही पुढे!

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

SCROLL FOR NEXT