PR Sreejesh and Deepika  E sakal
क्रीडा

खेलरत्न पुरस्कारासाठी श्रीजेश-दिपिकाच्या नावाची शिफारस

या दोन खेळाडूंशिवाय हरमनप्रित सिंग, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांच्या नावाची अर्जुन पुरस्काराची शिफारस करण्यात आलीये.

सुशांत जाधव

क्रीडा जगतातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने दोन दिग्गज खेळाडूंच्या नावाची शिफारस केलीये. भारतीय संघाचा विद्यमान गोलकिपर पीआर श्रीजेश आणि माजी महिला हॉकीपटू दिपिका ठाकूर यांचा यात समावेश आहे. हॉकी इंडियाने शनिवारी त्यांच्या नावाची शिफारस केल्याची घोषणा केली. या दोन खेळाडूंशिवाय हरमनप्रित सिंग, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांच्या नावाची अर्जुन पुरस्काराची शिफारस करण्यात आलीये.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी 1 जानेवारी 2017 ते डिसेंबर 2020 या कालावधीत केलेल्या कामगिरीचा विचार करण्यात आलाय. पीआर श्रीजेश याने भारतीय हॉकी संघातून लक्षवेधी कामगिरी केलीये. 2018 मध्ये हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने रौप्य कामगिरी केली होती. 2018 मधील आशियाई क्रीडा प्रकारात टीम इंडियाने कांस्य पदक मिळवले होते. 2019 मध्ये भुवनेश्वरमध्ये झालेल्या FIH Men's Series Finals मध्ये टीम इंडियाने सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. यात श्रीजेशने मोलाचा वाटा उचलला होता. यापूर्वी श्रीजेशला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार तर 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

दिपिका ठाकूर हिने भारतीय महिला संघात लक्षवेधी कामगिरी बजावलीये. 2018 मध्ये आशियाई क्रीडा प्रकारासह आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती. यात दिपिकाचा मोलाचा वाटा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT