Hockey practice begins for Asian Games 
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हॉकीच्या सरावास सुरवात 

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाला सुरवात झाली. आशियाई स्पर्धेपूर्वी हॉकी संघाची अनेक शिबिरे होणार असून, पहिले शिबिर उद्यापासून (बुधवार) 'साई'च्या बंगळूर येथील केंद्रावर सुरू होईल. 

या शिबिरात स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 18 खेळाडूंसह सात राखीव खेळाडूंचा समावेश असेल. बांगलादेश, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय पुरुष खेळाडूंना 21 दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर उद्यापासून पहिले शिबिर सुरू होईल. हे पहिले शिबिर 11 दिवसांचे असेल. 

भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंदर सिंग म्हणाले, "व्यग्र कार्यक्रम पार पडल्यावर खेळाडूंना आवश्‍यक ती विश्रांती मिळाली आहे. आता आम्ही शिबिराला सुरवात करणार आहेत. उणिवा शोधून त्यावर काम करण्याबरोबर सरावाचा दर्जा सर्वोत्तम असाच राहील.'' 
भारतीय खेळाडूंना विश्रांती आवश्‍यक होती, असे सांगून प्रशिक्षक हरेंदर सिंग म्हणाले, "आशियाई स्पर्धेसाठी खेळाडू फ्रेश असणे आवश्‍यक होते. विश्रांती मिळाल्यामुळे सर्वच खेळाडू ताजेतवाने असतील. शिबिरात सर्कलच्या आत मिळालेल्या संधी कशा साधल्या जातील यावर अधिक काम केले जाईल.'' 

विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेपूर्वी आशियाई स्पर्धेतील यश किती महत्त्वाचे आहे, याची खेळाडूंना कल्पना आहे. त्यामुळे शिबिरापासूनच भारतीय खेळाडू अधिक ऊर्जेने तयारीला सुरवात करतील. 
हरेंदर सिंग, भारतीय संघाचे प्रशिक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT