Hong Kong Qualified For Asia Cup Cricket Tournament India 
क्रीडा

Asia Cup 2022 : दोन तगड्या संघाच्या ग्रुपमध्ये हाँगकाँगची एन्ट्री

आता भारत, पाकिस्तानशी लढणार

सकाळ वृत्तसेवा

मस्कट : हाँगकाँगचा संघ यंदाच्या आशियाई करंडकासाठी पात्र ठरणारा सहावा देश ठरला आहे. हाँगकाँग संघाने पात्रता फेरीच्या अखेरच्या लढतीत अमिराती संघाला ८ गडी व ६ चेंडू राखून पराभूत केले आणि मुख्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांच्यासमोर अ गटात भारत व पाकिस्तान या बलाढ्य देशांचे आव्हान असणार आहे. (Hong Kong Qualified for Asia cup cricket tournament India)

आशियाई करंडकाच्या मुख्य फेरीला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या पात्रता फेरीमध्ये हाँगकाँग, कुवेत, अमिराती व सिंगापूर या चार देशांचा समावेश होता. हाँगकाँगने तिन्ही लढती जिंकून ६ गुणांसह पहिले स्थान पटकावले आणि मुख्य फेरीची पात्रता मिळवली. कुवेतचा संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. हाँगकाँगने पात्रता फेरीतील अखेरच्या लढतीत अमिरातीवर विजय साकारत आगेकूच केली. अमिरातीकडून मिळालेले १४८ धावांचे आव्हान हॉंगकाँगने २ गडी गमावत ओलांडले.

गटवारी

अ - भारत, पाकिस्तान, हाँगकाँग

ब - श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान

प्राथमिक साखळी फेरीच्या लढती

  • २७ ऑगस्ट - अफगाणिस्तान - श्रीलंका

  • २८ ऑगस्ट - भारत-पाकिस्तान

  • ३० ऑगस्ट - अफगाणिस्तान - बांगलादेश

  • ३१ ऑगस्ट - भारत- हाँगकाँग

  • १ सप्टेंबर - बांगलादेश- श्रीलंका

  • २ सप्टेंबर - पाकिस्तान- हाँगकाँग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT