hope for second medal from Manu partners with Sarabjot Singh in 10 m Air Pistol Mixed event paris olympic 2024 sakal
क्रीडा

Paris Olympic 2024 : मनूकडून आज पुन्हा पदकाची आशा; मिश्र प्रकारात सरबज्योत सिंगसह ब्राँझपदकासाठी लढा

10 m Air Pistol Mixed event paris olympic 2024| पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या मनू भाकर या भारतीय कन्येला सुवर्ण इतिहास रचण्याची संधी असणार आहे. प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात आणखी एक पदक जिंकण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पॅरिस ­­: पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावत देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या मनू भाकर या भारतीय कन्येला सुवर्ण इतिहास रचण्याची संधी असणार आहे. प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात आणखी एक पदक जिंकण्यासाठी ती आता सज्ज झाली आहे.

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनू-सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने प्रभावी कामगिरी केली. ब्राँझपदकासाठीच्या लढतीत भारतीय जोडी सहभागी होणार असून या लढतीत त्यांच्यासमोर ओह जिन-ली वॉनहो या कोरियन जोडीचे आव्हान असणार आहे.

मिश्र प्रकारात पात्रता फेरीत अव्वल चार क्रमांकावर विराजमान होणाऱ्या जोड्या पदकासाठी दावेदार ठरतात. तुर्कीच्या इलयादा तरहान-युसूफ डिकेच या जोडीने ५८२ गुणांची कमाई करीत पहिले स्थान पटकावले. त्यांनी ऑलिंपिकचा विक्रमही नोंदवला.

सर्बीयाच्या झोराना अरुणोविच व दामिर मिकेच या जोडीने ५८१ गुणांची कमाई करीत दुसरे स्थान मिळवले. त्यामुळे तुर्की व सर्बीया या देशांमध्ये सुवर्ण व रौप्यपदकासाठी लढत होईल. या लढतीत जिंकलेला संघ सुवर्णपदकावर मोहोर उमटवेल. पराभूत संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागेल.

कोरियाशी लढत

मनू भाकर-सरबज्योत सिंग या जोडीने पात्रता फेरीत ५८० गुण कमावले. भारतीय जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली, तसेच कोरियन नेमबाजांनी ५७९ गुणांची कमाई करीत चौथे स्थान पटकावले. भारत व दक्षिण कोरिया या जोडीमध्ये उद्या (ता. ३०) ब्राँझपदकासाठी लढत रंगणार आहे.

रिदम-अर्जुन जोडी अपयशी

रिदम सांगवान व अर्जुन चीमा या भारतीय जोडीला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात अपयशाला सामोरे जावे लागले. या जोडीला ५७६ गुणांची कमाई करता आली. त्यामुळे रिदम व अर्जुन जोडीची दहाव्या स्थानावर घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT