Pakistan vs Afghanistan ODI Naseem Shah Statement Video 
क्रीडा

Naseem Shah : 'एक दिवस मला हृदयविकाराचा...' आशिया कपपूर्वी पाकिस्तानी खेळाडूला मृत्यूची भीती! वक्तव्याने उडाली खळबळ

Kiran Mahanavar

Pakistan vs Afghanistan ODI Naseem Shah Statement Video : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका युवा खेळाडूची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. भारताविरुद्धच्या आशिया कपमध्ये त्याच्या उतरण्याची क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या श्वास रोखणाऱ्या थरारक सामन्यात अखेरच्या षटकात त्याने संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले.

पाकिस्तानचा 20 वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाह गोलंदाजीपेक्षा फलंदाजीमुळे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदवला. या विजयासह मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. शेवटच्या षटकात नसीमने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. याआधी गेल्या वर्षीही आशिया कपदरम्यान अशाच एका सामन्यात त्याने सलग दोन षटकार मारून पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

नसीम शाहचा मॅचनंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दबावाबाबत बोलताना दिसत आहे. तो म्हणाले की, माझी पाळी शक्य तितक्या शेवटची यावी, असे होऊ नये की एखाद्या दिवशी अशा सामन्यादरम्यान मला हृदयविकाराचा झटका येईले आणि माझा मृत्यू होईल.

पुढे तो म्हणाला की, जेव्हा जेव्हा मी एखाद्या परिस्थितीत जातो तेव्हा माझा स्वतःवर विश्वास असतो. मी फलंदाजीसाठी आत गेलो तेव्हा परिस्थिती अशी होती. शादाबबद्दल मला खात्री होती की, आम्ही सामना संपवून परत येऊ, पण जेव्हा तो आऊट झाला तेव्हा मला असे वाटले की आतापर्यंत सर्व काही माझ्यावर आले आहे. मी करेन, असा विचार केला. आम्हाला या विजयाची खूप गरज होती. माझा स्वतःवर विश्वास होता कारण मी नेटमध्येही खूप फलंदाजी करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT