Rishabh Pant
Rishabh Pant  esakal
क्रीडा

Rishabh Pant : "माझ्या आईला फोन करा", रक्तबंबाळ अवस्थेत पंत बस ड्रायव्हरला म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी कार अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्या अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, या अपघातानंतर सर्वप्रथम सुशील कुमार नावाचा एक बस ड्रायव्हर ऋषभ जवळ पोहोचला होता. त्यानंतर नेमकं काय घडलं हे सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. अपघात होताच पंतने आईला फोन करायला लावला होता. असे कुमार यांनी म्हटलं आहे. (How bus driver Sushil Kumar saved Rishabh Pant Meri mummy ko phone mila do )

तच्या गाडीला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीवरुन रुडकीला जाताना त्याची कार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कारला आग लागली. सुदैवाने या अपघातातून ऋषभचे प्राण वाचले. पण ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. ऋषभची कार रुडकीच्या गुरुकुल नारसन क्षेत्रात डिवायडरला धडकली. जखमी ऋषभ पंत विंडो स्क्रीन तोडून बाहेर पडला.

या अपघातानंतर पहिल्यांदा सुशील कुमार नावाचा एक बस ड्रायव्हर ऋषभ जवळ पोहोचला होता. त्याने पंतला सावरलं. रुग्णवाहिका बोलून पंतला रुग्णालयात पाठवलं. ऋषभला मी पाहिलं, तेव्हा तो रक्तबंबाळ अवस्थेत होता. मी क्रिकेटर ऋषभ पंत आहे, अशी ओळख त्याने सांगितली.

तसेच माझ्या आईला फोन करा अस ऋषभ म्हणाला. कुमारला फोन कारजवळ पडलेला दिसला. त्याने तो पंताकडे आणला आणि मग आईचा नंबर डायल केला. पण तो बंद होता. त्यानंतर कुमार यांनी तातडीने पंतला रुग्णलायत दाखल केले.

ड्रायव्हरने काय सांगितलं?

“मी हरियाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिव्दारवरुन येत होतो. नारसनपासून 200 मीटर अंतरावर दिल्लीकडून येणारी कार डिवायडरला धडकली. या कारचा स्पीड 60 ते 70 किमी प्रतितास होता. धडकल्यानंतर कार हरिद्वार लाईनमध्ये आली. आमची बस सुद्धा धडकली असती.

ऋषभच्या कारपासून मी 50 मीटर अंतरावर होतो. मी बस सर्विस लाइनमधून फर्स्ट लाइनवर आणली. माझ्या बसचा स्पीड 50 ते 60 होता. मी लगेच ब्रेक मारून खिडकीतून खाली उडी मारली” असं त्या ड्रायव्हर कुमारने सांगितलं.

मी पाहिलं ऋषभ पंत जमिनीवर पडलेला होता. कारमधून आगीचा स्पार्क येत होता. आम्ही त्याला उचलून बाजूला नेलं. कारच्या आत अजून कोणी आहे का? म्हणून विचारलं. मी एकटाच आहे, ऋषभ पंत असल्याच त्याने सांगितलं. मला क्रिकेटबद्दल इतकी माहिती नाही. मी त्याच्या बाजूला उभा राहिलो. शरीरावर कपडे नव्हते. आम्ही त्याच्या अंगावर चादर लपेटली. पोलिसांना फोन केला. रुग्णवाहिका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाठवलं” अशी माहिती बस ड्रायव्हर कुमारने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT