How much prize money did Rohit Sharma`s Team India  sakal
क्रीडा

Team India T20 WC : उपांत्य फेरीत पराभूत होऊनही टीम इंडिया मालामाल, मिळणार इतके कोटी

उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी टीम इंडिया करोडपती

सकाळ ऑनलाईन टीम

Team India T20 WC : भारतीय संघाचा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव केला. या पराभवाने कोट्यवधी भारतीय चाहते नाराज झाल्या. 13 नोव्हेंबरला आता इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी टीम इंडियाला बंपर बक्षीस रक्कम मिळणार आहे.

भारतीय संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी प्रथम $400,000 मिळतील. यासोबतच सुपर-12 टप्प्यातही टीम इंडियाने पाच पैकी चार सामने जिंकले होते, त्यामुळे एक लाख साठ हजार डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळणार आहे. म्हणजेच टी-20 विश्वचषकात भारताला एकूण 4.51 कोटी रुपये ($560,000) बक्षीस रक्कम मिळणार आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

आयसीसीने टी-20 वर्ल्ड सुरू होण्यापूर्वीच बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण $5.6 दशलक्ष (रु. 45.14 कोटी) ची बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. जी सर्व 16 संघांमध्ये वेगवेगळी वाटली जाणार आहे. यानुसार टी-20 विश्वचषक विजेत्या संघाला $1.6 दशलक्ष (रु. 12.89 कोटी), उपविजेत्या संघाला $8 लाख दशलक्ष (रु. 6.44 कोटी) मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या उर्वरित दोन संघांना 4-4 लाख डॉलर्स दिले जाणार आहेत.

सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या 8 संघांनाही आयसीसीकडून बक्षीस मिळणार आहे. या संघांना 70 हजार डॉलर्स दिले जातील, तर गेल्या टी-20 विश्वचषकात ही रक्कम 40 हजार डॉलर्स होती. पात्रता फेरीतूनच बाहेर पडलेल्या चार संघांना $40,000 दिले जाणार आहेत. तर पहिल्या फेरीतील विजयावर 40 हजार डॉलर्सची तरतूद होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT