FIFA World Cup 2022 football marathi news  sakal
क्रीडा

FIFA World Cup22: बलाढ्य असूनही युरोपीय संघांवर दडपण

स्पेन, पोर्तुगालची विजयासाठी शर्थ; मोरोक्को, स्वित्झर्लंडचे कडवे आव्हान

Kiran Mahanavar

FIFA World Cup 2022 : युरोप खंडातील दोन बलाढ्य संघ आज दडपणाखाली खेळतील. फिफा क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेला स्पेनचा संघ व नवव्या स्थानावर असलेला पोर्तुगालचा संघ फिफा विश्‍वकरंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. स्पेनसमोर १२ व्या स्थानावरील मोरोक्को व पोर्तुगालसमोर १५ व्या स्थानावरील स्वित्झर्लंडचे आव्हान असणार आहे.

मोरोक्को संघाने साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी करीत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. मोरोक्को - क्रोएशिया यांच्यामधील सलामीची लढत गोलशून्य बरोबरीत राहिली. त्यानंतर मोरोक्कोने दुसऱ्या स्थानावरील बेल्जियमला २-० असे पराभूत करीत बाद फेरीसाठी आपली दावेदारी पक्की केली. अखेरच्या लढतीत त्यांनी कॅनडाला पराभूत केले आणि बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला.

मोरोक्कोने १९८६ नंतर बाद फेरी गाठली आहे. ही त्यांच्यासाठी मोठी बाब आहे. बेल्जियमला पराभूत केल्यानंतर आता मोरोक्कोच्या संघाचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावला असेल. त्यामुळे स्पेनविरुद्धच्या लढतीत त्यांचा संघ दबावाखाली खेळेल, असे वाटत नाही.

स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस एनरीके यांनी स्पेशल योजना आखली आहे. फुटबॉलवरील जास्तीतजास्त नियंत्रण आपल्याकडे असावे, अशी त्यांनी रणनीती बनवली आहे. यामुळे गोलरक्षक उनाई सिमॉन याच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली आहे. नव्या योजनेत सिमॉनकडून त्याच्या जवळ असलेल्या सहकाऱ्यांना पास देणे गरजेचे आहे. याप्रसंगी पास देताना सिमॉन याला गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. कारण छोटे पास देताना प्रतिस्पर्ध्यांकडे तो फुटबॉल गेल्यास त्यांच्याकडे गोल करण्याची संधी निर्माण होईल. यामुळे स्पेनला या योजनेचा फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ता लक्ष ब्रुनो फर्नांडिसवर

ख्रिस्तियानो रोनाल्डो व पोर्तुगाल हे समीकरण सर्वश्रूत आहे, पण रोनाल्डोचे वाढते वय लक्ष घेता आता पोर्तुगालला नव्या हिरोची गरज आहे. यंदाच्या विश्‍वकरंडकात त्यांना तो गवसला. २८ वर्षीय ब्रुनो फर्नांडिस हे त्याचे नाव! मिडफिल्डमध्ये तो आपले कसब दाखवतो. प्लेमेकरची भूमिकाही बजावतो. यंदाच्या विश्‍वकरंडकात त्याने पोर्तुगालसाठी सर्वाधिक २ गोल केले आहेत. एवढेच नव्हे तर दोन गोलांना साह्य केले आहे. मिडफिल्ड व बचावफळी यांच्यामधील योग्य समन्वय त्याने साधला आहे. त्यामुळे आता आगामी वर्षांमध्ये त्याच्या खेळाकडे लक्ष असेल यात वाद नाही.

स्पेनचे वर्चस्व

स्पेन-मोरोक्को यांच्यामधील आतापर्यंत झालेल्या लढतींवर नजर टाकता स्पेनचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून येईल. स्पेन- मोरोक्को यांच्यामध्ये आतापर्यंत पाच लढती झाल्या आहेत. यापैकी दोन लढतींमध्ये स्पेनने विजय मिळवला असून तीन लढती बरोबरीत राहिल्या आहेत. २०१८ मध्ये स्पेन-मोरोक्को यांच्यामध्ये झालेली लढत २-२ अशी बरोबरीत राहिली.

रोमहर्षक लढती

पोर्तुगाल-स्वित्झर्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत १० लढती रंगल्या आहेत. या लढतींच्या निकालावर लक्ष देता दोन देशांमध्ये कमालीची चुरस दिसून येत आहे. पोर्तुगालने तीन लढतींमध्ये, तर स्वित्झर्लंडने दोन लढतींमध्ये विजय संपादन केला आहे. तसेच दोन देशांमधील पाच लढती बरोबरीत राहिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT