HS Prannoy ESAKAL
क्रीडा

World Championships : जागतिक स्पर्धेतील यशानंतर भारताचा बॅडमिंटनपटू भावूक; ब्राँझपदक मिळवल्याचा आनंद; प्रणॉय

जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावणाऱ्या प्रणॉयने देशासाठी मौल्यवान कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न याच्याकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे भारताच्या एच. एस. प्रणॉय याच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्याच्या आशांना सुरुंग लागला; मात्र जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावणाऱ्या प्रणॉयने देशासाठी मौल्यवान कामगिरी केली होती.

याच पार्श्वभूमीवर प्रणॉय म्हणाला, गेली १२ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील पदकाचे मोल मोठे आहे. मला सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी ब्राँझपदक मिळवल्याचे समाधान आहे.

भारताचा अनुभवी खेळाडू पुढे म्हणाला, बऱ्याच व्यक्तींच्या सहकार्यामुळे मला इथपर्यंत मजल मारता आली आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबियांचाही मोलाचा पाठिंबा होता. सराव व स्पर्धा यामुळे वर्षभर कुटुंब व मित्रांपासून दूर राहावे लागते. हा प्रवास खडतर असतो. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील पदक मौल्यवान ठरते. त्यामुळे आगामी काळात चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.

उपांत्य फेरीच्या लढतीत प्रणॉयने पहिला गेम जिंकत आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्येही त्याच्याकडे ५-१ अशी आघाडी होती, पण त्यानंतरही प्रणॉयला या लढतीत विजय मिळवता आला नाही. या वेळी प्रणॉय म्हणाला, जेव्हा तुम्ही कोर्टवर खेळत असता,

तेव्हा तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केल्याचे वाटते, पण लढत संपल्यानंतर कामगिरीत आणखी सुधारणा करता येऊ शकल्या असत्या असे वाटू लागते; मात्र उपांत्य लढतीआधीच्या दोन लढती तीन गेमपर्यंत रंगल्या होत्या. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या मी थकलो होतो. प्रतिस्पर्ध्याकडून अव्वल दर्जाचा खेळ करण्यात आला, असे प्रणॉय म्हणाला.

बॅडमिंटन या खेळामध्ये तांत्रिक बाबींना महत्त्व असते. त्यामुळे अव्वल स्तरावर खेळण्यासाठी तुमच्या शरीराने साथ द्यायला हवी. वयाच्या ३५ किंवा ३६ व्या वर्षी त्याच वेगाने खेळण्याचे आव्हानात्मक ठरते. असंख्य युवा खेळाडू येत आहेत. त्यांच्यासमोर कमीत कमी चुका कराव्या लागतात. त्यांच्यासोबत बॅडमिंटन कोर्टवर खेळताना तुमचा वेग कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर निभाव लागू शकत नाही.

- एच. एस. प्रणॉय,ब्राँझपदक विजेता, जागतिक स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT