David Willey Retirement Esakal
क्रीडा

David Willey Retirement: वर्ल्ड कपच्या शेवटच्या सामन्यात सर्वोत्तम तरी... दिग्गज खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रूमध्ये दुर्लक्षित असल्याचे आपल्याला जाणवत होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रूमध्ये दुर्लक्षित असल्याचे आपल्याला जाणवत होते. अखेरच्या सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलो, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा आपला निर्णय कायम आहे, असे भावनिक मत वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने व्यक्त केले.

विश्वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेवर आलेल्या इंग्लंड संघातील सर्व खेळाडूंबरोबर त्यांच्या क्रिकेट मंडळाने वार्षिक करार केलेला होता. अपवाद मात्र विलीचा. त्यामुळे 'गाडीचे तिसरे चाक' असे आपल्याला वारंवार वाटत असायचे. काहीशी निराशेनेच त्याने ही विश्वकरंडक स्पर्धा आपली अखेरची असणार, हे त्याने अगोदरच जाहीर केले होते.

पाकिस्तानविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात त्याने तीन विकेटची कामगिरी करताना एकदिवसीय क्रिकेटमधील बळींचे शतक पूर्ण केले; तसेच तो सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.

अशा प्रकारच्या नकारावर मी ठाम राहीन, असे वाटले नव्हते; परंतु आत्ता मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. संघातील एकमेव असा खेळाडू ज्याच्याशी मंडळाने आर्थिक करार केला नव्हता, याचा पुनरुच्चार विलीने केला. अशा प्रकारे करारबद्ध नसल्याची खंत त्याने पुन्हा बोलून दाखवली.

मी माझी भूमिका आणि जबाबदारी पार पाडली आहे. दुःखद मनाने मी निवृत्त होत आहे. कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मी माझ्या अखेरच्या सामन्यात करू शकलो, याचा आनंद आहे, अशीही भावना विलीने बोलून दाखवली. इंग्लंड संघातील माझी उपयुक्तता किती होती, हे मला चांगले माहीत होते. कोणी तरी दुखापतग्रस्त झाला, तर मला बोलावले जायचे. संघात खेळायला मिळातेय, याचा आनंद असायचा; पण याचा अर्थ मी निराश नाही, असाही नाही, असे विलीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाची सरकारला धास्ती! विखे पाटलांची सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Teachers Post : राज्यातील १३ हजार ११९ उमेदवारांची ‘शिक्षक’ पदासाठी निवड

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune News : ‘आयसर’मध्ये आंदोलनाचा भडका; प्रशासनाच्या मनमानी कारभारावर ठपका

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT