Mohammad Rizwan
Mohammad Rizwan Sakal
क्रीडा

ICC Awards : आपल्या कॅप्टनला धोबीपछाड देत रिझवान ठरला किंग

सुशांत जाधव

ICC Awards Mohammad Rizwan T20 Player Of The Year : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने आपल्या कॅप्टनला धोबी पछाड देत टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च पुरस्काराला गवसणी घातलीये. आयसीसीच्या (ICC Awards) वर्षातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूचा पुरस्कारावर मोहम्मद रिझवानने आपले नाव कोरले. 2021 च्या हंगामातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने हा पुरस्कार पटकवला. महिला गटात इंग्लंडची टॅमी ब्युमोंट हिला 2021 मधील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवडण्यात आले. तिने भारतीय संघातील बॅटर स्मृती मानधनाला मागे टाकून पुरस्कार पटकवला.

2021 मध्ये रिझवानची दमदार कामगिरी

बॅटिंगशिवाय मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने विकेटमागेही लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली. पाकिस्तान संघाला (Pakistan Cricket Team) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलपर्यंत नेण्यात रिझवानने मोलाचा वाटा उचलला होता. रिझवानने केवळ 29 सामन्यात 73.66 च्या सरासरीसह 134.89 के स्ट्राइक रेटनं 1,326 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या लाहोरमधील मैदानातून त्याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावले होते. कराचीमध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात त्याने 87 धावांची धमाकेदार खेळी केली होती.

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत करुन दाखवलं होते. वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने टीम इंडियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात रिझवानने 55 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने टीम इंडियाला एकहाती पराभूत केले होते.

पाकिस्तान महिला क्रिकेटर फतिमा सना हिच्या कामगिरीची देखील आयसीसीनं दखल घेतली आहे. नवोदित खेळाडूंचा पुरस्कार सनाला देण्यात आला आहे. दुसरीकडे पुरुष गटात दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान याला उद्योन्मुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT