india  sakal
क्रीडा

ICC Cricket World Cup 2023 : लय कायम ठेवण्याची जोमात तयारी; भारतीय संघ आठवडाभरानंतर रविवारी मैदानात उतरणार

अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंडचा संघ कागदावर सगळ्यांनाच दणकट भासत होता,

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

लखनौ - विश्वचषक स्पर्धा चालू होण्याअगोदर सगळे जाणकार इंग्लंडच्या संघाचा उदो उदो करताना उपांत्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंड प्रमुख दावेदार असेल, असा विश्वास व्यक्त करत होते. सगळ्या क्रिकेट पंडितांच्या अंदाजाला इंग्लंडच्या संघाने अत्यंत सुमार खेळ करून सुरुंग लावला. पाचपैकी चार सामने गमावलेल्या इंग्लंड संघाचा रविवारी पाचपैकी पाच लढती जिंकलेल्या भारतीय संघासोबत सामना होणार आहे.

अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला इंग्लंडचा संघ कागदावर सगळ्यांनाच दणकट भासत होता, पण त्यांच्या सगळ्याच खेळाडूंनी निराशा करणारा खेळ केला. परिणामी चार सामन्यांत इंग्लंडला हार पत्करावी लागली. लखनौला रविवारी होणारा सामना भारताने जिंकला तर उपांत्य फेरी जवळपास निश्चित होणार आहे. जर उलटे झाले तर इंग्लंडच्या अंधुक आशा जिवंत राहतील.

ऑक्टोबरच्या उन्हात सराव

लखनौच्या मैदानावर भारतीय संघाने शुक्रवारी भर दुपारी दोन वाजता सराव केला. उत्तर प्रदेशात ऑक्टोबर महिन्याची गरम आणि कोरडी हवा पसरू लागली आहे. सामन्यात खेळताना याच हवेचा सामना करावा लागणार असल्याने भारतीय संघातील खेळाडू त्याचा अंदाज घेत सराव करताना दिसले.

सरावादरम्यान उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्‍या तरुण वेगवान गोलंदाजांशी मोहम्मद शमी दीर्घकाळ संवाद करताना दिसला.

खेळपट्टी संथ असणार?

मैदानावरचे कर्मचारी खेळपट्टीवरील उरलेसुरले गवत ब्रशने उभे करून कापायच्या प्रयत्नात होते. इंग्लंडसमोर खेळताना गवत नसलेली काहीशी संथ खेळपट्टी असण्याची शक्यता दाट आहे.

गोलंदाजीचा सराव

अजून किमान दोन सामने हार्दिक पंड्या खेळण्याची शक्यता नसल्याने गुरुवारी भारतीय संघातील सर्वच फलंदाज चक्क गोलंदाजीचा सराव करत होते. शुक्रवारी भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांना संघ व्यवस्थापन मन लावून फलंदाजीचा सराव देताना बघायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pulwama attack: पुलवामा हल्ल्यासाठी ऑनलाईन स्फोटके खरेदी केले; FATF चा धक्कादायक खुलासा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पोर्टल बंद, नव्याने पात्र महिला लाभापासून वंचित

Latest Maharashtra News Updates : आझाद मैदान मध्ये शिक्षकांचा आंदोलन, रोहित पवारांचा पाठिंबा

Narayangaon Crime : बनावट नवरी मुलीसह सात जणांची टोळी जेरबंद; सहा ते सात अविवाहित तरुणांची केली फसवणूक

Bike Taxi Service Ban: रॅपिडो बाईक टॅक्सी अखेर बंद, सर्वांचे लक्ष सरकारच्या 'ई-टॅक्सी'कडे

SCROLL FOR NEXT