India Vs Pakistan PCB Complaint : भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान अहमदाबादच्या स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी पाकिस्तानी खेळाडूंविरूद्ध घोषणाबाजी केली होती. यानंतर चिडलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे याची अधिकृत तक्रार केली.
मात्र या तक्रारीचा फारसा उपयोग होईल याची शक्यता नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीवर कारवाई करण्याबाबत फारशी उत्सुक नाही. कारण आयसीसीचे कोड ऑफ कंडक्ट हे एखादुसऱ्या व्यक्तींविरूद्ध लागू होतात समुहाविरूद्ध लागू होत नाहीत.
भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा सात गडी राखून पराभव केला. भारताने वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या विजयाची अष्टमी पूर्ण केली. विशेष म्हणजे भारताने हा विजय जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर मिळवला.
मात्र या सामन्यादरम्यान काही अनुचित प्रकार देखील घडले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानात येत असताना त्याची हुर्यो उडवली. त्यानंतर मोहम्मद रिझवान बाद झाल्यानंतर देखील जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे हाय व्होल्टेज सामन्याला गालबोट लागले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन झाका अश्रफ देखील यावेळी स्टेडियममध्ये उपस्थितीत होते. ते या सर्व प्रकाराचे साक्षीदारच ठरले. त्यांनी पाकिस्तानमध्ये परत गेल्यानंतर पीसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर पीसीबीने आयसीसीकडे अधिकृत तक्रार देखील केली.
आयसीसी चेअरमन ग्रेग बार्क्ले यांनी देखील आम्ही वर्ल्डकप आयोजनातील उणिवा दूर करू असे वक्तव्य केलं. मात्र पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या उल्लंघनाचा नियम हा एखादुसऱ्या व्यक्तीविरूद्ध लागू होतो. समुहावर हा नियम लागू होत नाही त्यामुळे आयसीसी या प्रकरणात कारवाई करण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.