Oman vs Papua New Guinea  Sakal
क्रीडा

भारतीय वंशाच्या जतिंदरची बल्लेबल्ले, PNG विरुद्ध Oman चा मोठा विजय

अमिनीच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत अर्धशतकासह इलियासने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सुशांत जाधव

T20 World Cup 2021 Oman vs Papua New Guinea 1st Match :ओमानच्या अकिब इलियास आणि जतिंदर सिंग या सलामी जोडीनं केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ओमानच्या संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. पापुआ न्यू गिनी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 129 धावा करुन ओमान समोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामी जोडीनंच हे आव्हान पार केले.

इलियासने 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 चेंडूत 50 धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे भारतीय वंशाचा जतिंदर सिंगने 7 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 42 चेंडूत 73 धावांची खेळी केली. चौदाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर अमिनीच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत अर्धशतकासह इलियासने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पापुआ न्यू गिनीचा कर्णधार असद वला 56, चार्ल्स अमीनी 37 आणि सेसे बाऊ 13 धावा वगळता अन्य कोणत्याही दुहेरी आकडा पार करता आला नाही. परिणामी ओमानच्या गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनी संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 129 धावांपर्यंतच मजल मारता आली. ही धावसंख्या ओमानच्या सलामीवीरानीच पार करुन दाखवली. दोन गुणासह आता ते आपल्या गटात अव्वलस्थानी पोहचले आहेत.

सुपर 12 साठी 8 संघात लढत

सुपर-12 राउंडमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी 8 संघ क्वॉलिफायर राउंडमध्ये भिडणार आहेत. ग्रुप अ मध्ये श्रीलंका, आयर्लंड, नामीबीया आणि नेदरलँड या संघांचा समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, ओमान, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या दोन गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 साठी पात्र ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT