ICC ODI rankings latest asia cup 2023  
क्रीडा

Asia Cup 2023 : आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर ICC ने पाकिस्तानला दिला आणखी एक धक्का!

Kiran Mahanavar

ICC ODI rankings latest Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मध्ये रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. पाकिस्तानला कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 2 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानी संघ आशिया कपमधून बाहेर पडला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम फेरीत स्थान पक्के केले आहे.

पराभवासोबतच पाकिस्तान संघाला आयसीसीने मोठा धक्का दिला आहे. वनडे क्रमवारीत तिची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. यासोबतच टीम इंडियाने एकाचवेळी झेप घेत दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. या सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचे दुहेरी नुकसान झाले आहे.

ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे 3102 गुण आहेत. 115 रेटिंग आहेत. टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे 4516 गुण आणि 116 रेटिंग आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे 3061 गुण आणि 118 रेटिंग आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघही पहिल्या पाचमध्ये आहेत. इंग्लंडचा संघ चौथ्या आणि न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध 252 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. या स्पर्धेतील पाकिस्तानचा प्रवास पाहिला तर तो चढ-उतारांनी भरलेला होता. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव केला होता. यानंतर भारत विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बांगलादेशविरुद्धचा पुढचा सामना पाकिस्तानने 7 गडी राखून जिंकला. मात्र भारताविरुद्ध संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने त्याचा 228 धावांनी पराभव केला. श्रीलंकेविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला.

टीम इंडियाने यावेळी आशिया कपमध्ये एकही सामना गमावला नाही. त्याचा पहिला सामना रद्द झाला. यानंतर नेपाळविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळवला. सुपर-फोरमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले यानंतर श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT