Ind vs Pak WC 2023 Schedule  sakal
क्रीडा

ODI World Cup 2023: BCCIची वाढली डोकेदुखी! वर्ल्ड कपचे शेड्यूल पुन्हा बदलणार? मोठं कारण आलं समोर

Kiran Mahanavar

ODI World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी राहिला आहे. यावेळचा विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार आहे, हे सर्वांनाच माहित आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक यावेळी उशिरा जाहीर केले, पण नंतर सुरक्षा आणि इतर कारणांमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आला.

त्यावेळी भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले. आता पुन्हा एकदा हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने वर्ल्डकपच्या वेळापत्रकावर चिंता व्यक्त केली, त्यामुळे बीसीसीआय टेन्शनमध्ये आली आहे. एचसीएने पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली. त्यामुळे पाकिस्तानच्या सामन्यात बदल होऊ शकतो.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय कळवले आहे की त्यांना मागील काही दिवसांत विश्वचषक सामने आयोजित करणे कठीण होऊ शकते. 9 ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार असून त्याच मैदानावर दुसऱ्याच दिवशी श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

दोन्ही सामन्यामध्ये अंतर नसल्यामुळे हैदराबाद पोलिसांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आणि पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना अधिकाऱ्यांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. हा सामना आधी 12 ऑक्टोबरला होणार होता. पण अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला होणारा भारत-पाकिस्तान सामना पुन्हा नियोजित केल्यानंतर सामना पुढे हलवण्यात आला.

जेणेकरून पाक संघाला त्याच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल. भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. विश्वचषकाची तिकिटे अधिकृतपणे 25 ऑगस्टपासून विक्रीसाठी सुरू होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT