WC 2023 Qualification Scenarios sakal
क्रीडा

WC 2023 Qualification Scenarios : स्कॉटलंड की नेदरलँड भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी कोण येणार?

Kiran Mahanavar

ICC ODI World Cup Qualification Scenarios : एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी पात्रता सामने झिम्बाब्वेमध्ये खेळले जात आहेत. चाहत्यांना रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. श्रीलंका 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

त्याच वेळी झिम्बाब्वेच्या संघाने पात्रता फेरीच्या पहिल्या फेरीत त्यांचे सर्व चार सामने जिंकले, परंतु संघ सुपर सिक्समध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. सलग दोन सामने गमावून एकदिवसीय विश्व 2023 च्या शर्यतीतून बाहेर पडला.

आतापर्यंत 9 संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. शेवटच्या स्थानासाठी नेदरलँड आणि स्कॉटलंड यांच्यात लढत आहे. विश्वचषकात प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांची समीकरणे काय आहेत?

स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्ध चांगली कामगिरी करत झिम्बाब्वेचा 31 धावांनी पराभव केला. या विजयासह स्कॉटलंडसाठी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे दरवाजे खुले झाले आहेत.

स्कॉटलंडने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर सिक्स फेरीत चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँड्स सध्या क्वालिफायरमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. संघाचे 4 सामन्यांतून 2 विजयांसह 4 गुण आहेत आणि त्याचा ओव्हर रन रेट 0.042 आहे.

स्कॉटलंडसाठी समीकरण

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या पात्रता फेरीत 6 जुलै रोजी नेदरलँड आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होणार आहे. स्कॉटलंडला एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी नेदरलँड्सविरुद्ध फक्त विजयाची गरज आहे. या प्रकरणात त्याला 8 गुण मिळतील आणि तो दुसऱ्या स्थानावर पात्र ठरेल, कारण त्याचा रनरेट आधीपासूनच प्लसमध्ये आहे.

नेदरलँडसाठी समीकरण

या सामन्यात नेदरलँड्सने स्कॉटलंडला हरवल्यास झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि नेदरलँड्सचे प्रत्येकी 6 गुण होतील. मग हे प्रकरण रेट रन रेटमध्ये अडकू शकते. या कारणास्तव नेदरलँड्सला स्कॉटलंडविरुद्धचा सामना 32 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

दुसरीकडे स्कॉटिश संघाने प्रथम फलंदाजी करताना लक्ष्य निश्चित केले तर नेदरलँड्सला 44.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. त्यानंतरच संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT