New York India Vs Pakistan esakal
क्रीडा

India Vs Pakistan New York : पोर्टेबल स्टेडियममध्ये भारत पाकिस्तान सामना... तोही न्यूयॉर्कमध्ये; ICC चं मोठं प्लॅनिंग

अनिरुद्ध संकपाळ

New York India Vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा रोमांच हा जगावेगळाच असतो. मात्र गेल्या बऱ्याच वर्षापासून हा रोमांच फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच पाहायला मिळत आहे. पुढच्याच महिन्यात वनडे वर्ल्डकपदरम्यान भारत - पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी टी 20 वर्ल्डकपमध्येही भारत - पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे हा सामना थेट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात होण्याची शक्यता आहे. यासाठी आयसीसी मोठं प्लॅनिंग देखील करत आहे. 2024 च्या टी 20 वर्ल्डकपचे आयोजन हे वेस्ट इंडीज आणि युएस मिळून करणार आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अशा परिस्थितीत अमेरिकेतील भारतीय आणि पाकिस्तानी लोकांची मोठी संख्या पाहता भारत - पाकिस्तान हा सामना न्यू यॉर्क शहरात खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. आयसीसीने न्यू यॉर्क शहरापासून पूर्वेकडील जवळपास 30 मैल दूर एक 930 एकरात पसरलेल्या आयजनहावर पार्कमध्ये हा सामना खेळवण्याचा घाट घातला आहे.

या पार्कमध्ये जवळपास 34 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था केली जाईल. हा सामना पोर्टेबल स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे.

आयसीसी आणि न्यू यॉर्क शहर अधिकाऱ्यांची ब्रॉन्क्स येथे सामना खेळवण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र तेथील स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आणि एका क्रिकेट लीगमुळे या मनसुब्यांवर पाणी फिरले. त्यानंतर नासाऊ काऊंटीने याचा फायदा उचलला. आयसीसी आता नासाऊ काऊंटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.

अमेरिका क्रिकेटची वाढती बाजारपेठ

अमेरिकेत क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी आयसीसीमध्येच जोर धरू लागला आहे. हा देश जगातील सर्वात माध्यम बाजार असून जगातील सर्वात वेगाने वाढणारा क्रिकेट बाजार देखील आहे. आयसीसी आयोजनासाठी युएस मीडिया राईट्स डॉलरचे मूल्य हे पहिल्या 4 देशांपैकी एक आहे. यामुळेच टी 20 वर्ल्डकपचे सह यजमानपद अमेरिकेला देण्यात आले आहे. भारत - पाकिस्तान सामन्यामुळे अमेरिकेत क्रिकेटच्या वाढीला फायदा होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT