Indore Pitch ICC Rating
Indore Pitch ICC Rating  ESAKAL
क्रीडा

Indore Pitch Rating : इंदूरच्या खेळपट्टीने BCCI चं नाक कापलंच; आता द्या 14 दिवसात उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Indore Pitch ICC Rating : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना अवघ्या अडीच दिवसात संपला. पहिले दोन कसोटी सामने देखील अडीच दिवसात संपले होते. मात्र आयसीसीने तिसऱ्या कसोटीतील इंदूरच्या खेळपट्टीवर कडक शब्दात ताशेरे ओढले. आयसीसीने या खेळपट्टीला 'खराब' असे रेटिंग दिले आहे. आयसीसीने बीसीसीआयला याविरूद्ध 14 दिवसात आपले अपील करण्यास देखील सांगितले आहे.

आयसीसीने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आज जाहीर करते की आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सिरीजमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील होळकर स्टेडियमवरील खेळपट्टी ही खराब होती. हे रेटिंग आयसीसीचे खेळपट्टी आणि आऊटफिल्ड तपासणी प्रक्रियेनुसार देण्यात आले आहे.'

आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आपला अहवाल आयसीसीला सादर केला. यावेळी त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांबद्दलही चर्चा केली. यानंतर आता होळकर स्टेडियमला तीन डीमेरीट पॉईंट्स मिळाले आहेत. हा अहवाल बीसीसीआयला देखील सादर करण्यात आला आहे. यावर बीसीसीआयला 14 दिवसात अपील करता येणार आहे.

ब्रॉड म्हणातात, खेळपट्टी ही खूप शुष्क होती. ही खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समतोल निर्माण करत नव्हती. सुरूवातीपासूनच खेळपट्टी ही फिरकीला साथ देत होती. सामन्याच्या पाचव्या चेंडूवरच खेळपट्टीवरून माती उडाली. संपूर्ण सामनाभर असेच सुरू होते. वेगवान गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. संपूर्ण सामन्याच चेंडू असमान उसळी घेत होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT