ICC Send Jasprit Bumrah Special Cap He Share Cap Photo On Instagram Account esakal
क्रीडा

जसप्रीत बुमराहला आयसीसीकडून तब्बल 18 महिन्यांनी मिळाले 'खास' गिफ्ट

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेत जसप्रीत बुमराह खेळत नाहीये. मात्र जसप्रीत बुमराहची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. जसप्रती बुमराहने एक लाल रंगाची कॅप हातात घेऊन काढलेला फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला. ही कॅप आयसीसी टी 20 आंतरराष्ट्रीय दशकातील संघाची आहे. (ICC Send Jasprit Bumrah Special Cap He Share Cap Photo On Instagram Account)

आयसीसीने 2020 मध्ये सर्व फॉरमॅटमधील टीम ऑफ द डिकेडची घोषणा केली होती. टी 20 मध्ये भारताचे चार खेळाडू निवडण्यात आले होते. यात जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश होता. या संघाचा कर्णधार म्हणून धोनीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. जवळपास 18 महिन्यांनी आयसीसीने बुमराहला या संघाची कॅप पाठवून दिली आहे. या कॅपचा फोटो शेअर करत बुमराहने 'या सन्मानासाठी धन्यवाद आयसीसी' असे कॅप्शनही दिले.

2016 मध्ये भारतीय टी 20 संघात पदार्पण करणाऱ्या जसप्रीत बुमराहची या फॉरमॅटमधील आकडेवारी खूप दमदार आहे. त्याने आतापर्यंत 57 सामने खेळले असून यात फक्त 6.51 च्या सरासरीने धावा देत 67 विकेट घेतल्या आहेत. बुमराहने श्रीलंकेविरूद्ध फेब्रुवारीत आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये शेवटी शेवटची तो पुन्हा फॉर्ममध्ये आलेला दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT