ICC started a discussion to narrow gap between women's and men’s prize money
ICC started a discussion to narrow gap between women's and men’s prize money esakal
क्रीडा

ICC महिला क्रिकेटला देणार सरप्राईज; पुरुषांप्रमाणे मिळणार मोठ Prize?

सकाळ डिजिटल टीम

आयसीसीचे (ICC) सीईओ गेऑफ यांनी महिला क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा (Women's World Cup) जिंकणाऱ्या संघाला आणि पुरूषांचा वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेतील (Prize Money) मोठी तफावत कमी करण्याचा प्रयत्न आयसीसी करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पुरूष (Men's Cricket Team) आणि महिलांच्या आयसीसी स्पर्धेत विजत्या संघांना मिळणाऱ्या बक्षीस रक्कमेतील तफावत येत्या आठ वर्षात (2024 ते 2031) दूर करण्यासाठी योजना आखली जाईल.

गेऑफ पुढे म्हणाले की, 'आम्ही ही योजना आठ वर्षाच्या कालखंडातच राबवण्याचे कारण म्हणजे आयसीसीचे आर्थिक धोरण हे आठ वर्षाचा कालावधी डोळ्यासमोर ठेवूनच केले जाते. या कालखंडात आम्ही महिला आणि पुरूषांच्या स्पर्धांमधील बक्षीस रक्कमेतील मोठी तफावत दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही याबाबतची चर्चा पुढच्या सायकलपासून सुरू करणार आहोत. यात आम्ही महिला क्रिकेट स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम आणि पुरूषांच्या आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला मिळणारी रक्कम यातील तफावत कमी करण्याबाबत प्लॅन तयार करणार आहोत. आम्ही ही रक्कम समान करण्यापर्यंत अजून पोहचलेलो नाही. मात्र त्या दिशेने आम्ही प्रवास सुरू केली आहे.

विशेष म्हणजे आयसीसीने सध्याच्या महिला वनडे वर्ल्डकप विजेत्या संघांला मिळणारी बक्षीस रक्कम दुप्पट केली तरी (अंदाजे 10 लाख युएस डॉलर) ही रक्कम 2019 चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंडला मिळालेल्या बक्षीस रक्कमेपेक्षा (60 लाख युएस डॉलर) कमीच आहे. आयसीसीने याचबरोबर महिला वर्ल्डकपचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र या विस्तारीकरणाला अजून बराच काळ लागणार आहे. महिला वर्ल्डकपमधील 8 संघाचे 10 संघ होण्यासाठी जवळपास 2029 उजडावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT