Suryakumar Yadav ICC T20 Ranking ESAKAL
क्रीडा

Suryakumar Yadav ICC Ranking : सूर्याचे स्थान अढळ; शुभमन गिलच्या रँकिंगमध्ये तब्बल 43 स्थानांची उसळी

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav ICC T20 Ranking : भारताचा स्टार टी 20 फलंदाज सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत दोन अर्धशतकी खेळी केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने आयसीसी पुरूष टी 20 प्लेअर रँकिंगमधील आपले अव्वल स्थान अजून मजबूत केले.

तर भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गिलच्या रँकिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. तो संयुक्तरित्या 25 व्या स्थानावर पोहचला आहे.

सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत चार डावात 166 धावा केल्या. मालिकेत सुरूवातीला सूर्यकुमारच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. मात्र मालिकेच्या शेवटच्या तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतकी खेळी केल्या. त्याने टी 20 रँकिंगमधील आपले अव्वल स्थान अजून बळकट केले.

दुसरीकडे वेस्ट इंडीज विरूद्धच्या टी 20 मालिकेत 102 धावा करणाऱ्या शुबमन गिलच्या रँकिंगमध्ये तब्बल 43 स्थानांनी सुधारली. आहे. तो आता 25 व्या स्थानावर पोहचला आहे. त्याने विंडीजविरूद्धच्या चौथ्या सामन्यात 77 धावांची सामना जिंकून देणारी खेळी केली होती.

आयसीसी टी 20 सांघिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या भारताला पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत 3 - 2 अशी पराभवाची धूळ चारणाऱ्या विंडीज संघातील खेळाडूंना तगडा फायदा झाला आहे. सलामीवीर ब्रँडन किंगने निर्णायक पाचव्या सामन्यात 85 धावांची नाबाद खेळी केली होती.

किंगच्या रँकिंगमध्ये 5 स्थानांची सुधारणा झाली आहे. तो आता 13 व्या स्थानावर असून हे त्याचे करिअर बेस्ट टी 20 रँकिंग आहे. किंगने मालिकेत 173 धावा ठोकल्या आहेत. मात्र विंडीजच्या मालिकेत 176 धावा करणाऱ्या निकोलस पूरनच्या रँकिंगमध्ये घसरण झाली. तो एका स्थान खाली येत 15 व्या क्रमांकावर स्थिरावला आहे.

विंडीजचा फिरकीपटू अकील हुसैनने मालिकेत भारतीय फलंदाजांना चांगलेच दमवले होते. रँकिंगमध्ये त्याला तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता 11 व्या स्थानावर आहे. त्याने मालिकेत 5 विकेट्स घेतल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT