suryakumar yadav sakal
क्रीडा

ICC T20I Rankings : सूर्यकुमार यादवची चौथ्या स्थानावर घसरण

अव्वलस्थानासाठी रिझवान, बाबर आणि भारताचा सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस होती मात्र...

सकाळ ऑनलाईन टीम

ICC T20I Rankings : पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि सलामी फलंदाज महम्मद रिझवान सध्या जबरदस्त फॉर्मात असून बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० मानांकनामध्ये फलंदाजीत त्याने बाबर आझमला मागे टाकत अव्वलस्थानावर झेप घेतली आहे. अव्वलस्थानासाठी रिझवान, बाबर आणि भारताचा सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस होती. मात्र, सूर्यकुमार चौथे स्थानच मिळवू शकला.

रिझवान सध्या सुरू असलेल्या आशिया करंडकात जबरदस्त फॉर्मात असून तीन सामन्यांत त्याने १९२ धावा केल्या आहेत. त्याने हाँगकाँग आणि भारताविरुद्धच्या सामन्यात अनुक्रमे ७८ व ७१ धावा केल्या. यामुळेच तो दुसऱ्या स्थानावरून अव्वलस्थानावर विराजमान झाला. टी-२० आयसीसी मानांकनामध्ये अव्वलस्थानावर विराजमान होणारा रिझवान केवळ तिसरा पाकिस्तानी फलंदाज होय. यापूर्वी मिस्बा उल हक आणि बाबर आझम यांनी अव्वलस्थान मिळविले होते. बाबर तब्बल ११५५ दिवस अव्वलस्थानावर होता, असे आयसीसीने म्हटले आहे. या रँकिंगमध्ये पहिल्या दहांत सूर्यकुमारचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज स्थान मिळवू शकला नाही. श्रीलंकेविरुद्ध केलेल्या ७२ धावांमुळे रोहित शर्माने चार क्रमांकाची सुधारणा करताना १३ व्या क्रमांकावर झेप घेतली.

फिरकीपटूंचे वर्चस्व

गोलंदाजीत श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी आपल्या रँकिंगमध्ये जबरदस्त सुधारणा केली. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने तीन क्रमांकाची सुधारणा करताना वेस्ट इंडीजच्या हुसेन अकिलसोबत संयुक्तपणे सहावे स्थान मिळविले आहे. आशिया करंडकात तीन सामन्यांत तीन बळी घेणाऱ्या श्रीलंकेच्या महीश तिक्षणाला त्याचा पुरस्कार मिळाला असून त्याने दहा खेळाडूंत स्थान मिळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SA W World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली... नवी मुंबईतून समोर आली महत्त्वाची बातमी, जाणून घ्या टॉस कधी

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

Lucknow UNESCO Creative City for Gastronomy: लखनौच्या पाककलेची 'युनेस्को'ला भुरळ; सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश, नव्याने ५८ शहरांची भर

SCROLL FOR NEXT