ICC Test Ranking Ajinkya Rahane esakal
क्रीडा

ICC Ranking Ajinkya Rahane : कसोटी रँकिंगमध्ये अजिंक्यची जोरदार मुसंडी; न खेळताही अश्विन आहे फायद्यात

अनिरुद्ध संकपाळ

ICC Test Ranking Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने भारतीय संघात तब्बल 18 महिन्यांनी दमदार पुनरागमन केले. त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या डावात 89 धावांची आणि दुसऱ्या डावात 46 धावांची दमदार खेळी केली. याचा फायदा त्याला आयसीसी कसोटी बॅटिंग रँकिंगमध्ये झाला आहे.

याचबरोबर WTC Final खेळण्याची संधी न मिळालेल्या रविचंद्रन अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान अबाधित राखले आहे. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत अजिंक्य रहाणेसोबत भागीदारी रचणाऱ्या शार्दुल ठाकूरला देखील फायदा झाला आहे.

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या डावात 89 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी केली. त्यामुळे आयसीसी कसोटी फलंदाजी रँकिंगमध्ये 37 व्या स्थानावर पोहचला आहेत. तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या शार्दुल ठाकूरच्या रँकिंगमध्ये सहा अंकांची सुधारणा झाली आहे. तो 94 व्या स्थानावर पोहचला आहे.

कसोटी रँकिंगमध्ये ऋषभ पंतने संघाबाहेर असूनही आपले टॉप 10 मधील स्थान टिकवून ठेवले आहे. कार अपघातात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. तो सध्या रिहॅबिलिटेशन करत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा 12 व्या तर विराट कोहली 13 व्या स्थानावर आहे.

रविचंद्रन अश्विनला WTC Final मध्ये भारताच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवले नव्हते. तरी देखील त्याने कसोटी गोलंदाजी रँकिंगमध्ये आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. दुखापग्रस्त जसप्रीत बुमराह जुलै 2022 पासून कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच्या रँकिंगमध्ये 2 स्थानांची घसरण झाली आहे. तो आठव्या स्थानावर पोहचला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT