क्रीडा

ICC Ranking - कसोटीत विराटसेनेचाच जलवा

सूरज यादव

नवी दिल्ली - भारताने (India) पुन्हा एकदा कसोटीतलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयससीने कसोटी क्रमवारी (ICC Test Ranking) गुरुवारी जाहीर केली असून भारताचं यामध्ये वर्चस्व राहिलं आहे. भारतीय कसोटी संघ (India Test Team) पाँइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर असून भारताचे 121 पॉइंट झाले आहेत. भारतीय कसोटी संघाने 24 सामन्यात 2914 पॉइंट मिळवले आहेत.

भारतानंतर न्यूझीलंड (New Zealand) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ((World Test Championship) अंतिम सामना रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये फक्त एका पॉइंटचा फरक आहे. न्यूझीलंडने गेल्या 18 सामन्यात 2166 पॉइंट मिळवले असून त्यांचे रेटिंग पॉइंट 120 इतके झाले आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका 2-1 ने तर इंग्लंडविरुद्ध (England) 3-1 ने विजय मिळवला होता. दुसरीकडे न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानला 2-0 ने नमवलं होतं. या जोरावरच दोन्ही संघ रँकिंगमध्ये वरच्या स्थानी आहेत. आयसीसीने ट्विटरवरून रँकिंग टेबल शेअर केला आहे. आयसीसीने हे रँकिंग मे 2020 पासून खेळवण्यात आलेल्या सामन्यांच्या आधारे केलं आहे.

इंग्लडने 109 रेटिंग मिळवलं असून त्यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलिया यामुळे चौथ्या स्थानावर गेले आहे. ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉइंट 108 इतके आहेत. इंग्लंडला ऑस्ट्रेलियाकडून व्हाइट वॉश मिळाल्यानंतर रेटिंगमध्ये दणका बसला होता.

पाकिस्तानने पाचवे स्थान कायम राखले आहे. त्यांचे 94 रेटिंग पॉइंट झाले आहेत. तर वेस्ट इंडिजने 84 रेटिंग पॉइंटसह दोन स्थानांनी झेप घेतली. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला यामुळे एका स्थानाने धक्का बसला आहे. त्यांची अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थनी घसरण झाली. आफ्रिकेचे रेटिंग पॉइंट 80 तर लंकेचे 78 रेटिंग पॉइंट झाले आहेत. यामध्ये बांगलादेश 46 पॉइंटसह नवव्या तर झिम्बॉम्बे 35 पॉइंटसह शेवटच्या स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT