India U19  Sakal
क्रीडा

U19 World Cup : विकीचा 'पंजा'; धूल सेननं उडवला आफ्रिकेचा धुरळा!

सुशांत जाधव

भारतीय संघाने सलामीच्या लढतीत 45 धावांनी विजय नोंदवला

ICC Under 19 World Cup 2022 : भारतीय युवा संघाने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिलीये. वेस्ट इंडींडमध्ये सुरु असलेल्या अंडर वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 233 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 187 धावांत आटोपला. भारतीय संघाने सलामीच्या लढतीत 45 धावांनी विजय नोंदवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ब गटात अव्वलस्थान पटकावले आहे. (ICC Under 19 World Cup 2022 India U19 Beat South Africa U19 Opening Match)

भारताकडून विकीनं (Vicky Ostwal) दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याने 10 षटकात 28 धावा खर्च करून 5 विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेकडून Dewald Brevis 65 (99) आणि कॅप्टन George Van Heerden 36 (61) व्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाचा भारतीय माऱ्यासमोर निभाव लागला नाही.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) 5 (15) आणि हरनूर सिंग (Harnoor Singh) 1(3) ही जोडी स्वस्तात माघारी परतली. 2 बाद 11 अशी धावसंख्या असताना कर्णधार यश धूल (Yash Dhull) आणि राशिद ( Shaik Rasheed) यांनी 77 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

तिसऱ्या विकेटच्या या भागीदारीने भारतीय संघाचा डाव सावरला. राशिद 31 धावांवर बाद झाला. यश थूल शतकी खेळी करेल असे वाटत असताना तो 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल सिंधूनं 25 चेंडूत 27 धावा आणि कुशल तांबेनं तळाच्या फलंदाजीत 44 चेंडूत केलेल्या 35 धावांच्या जोरावर भारतीय संघाने 46.5 षटकात 232 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT