ICC Women’s ODI Rankings Smriti Mandhana Yastika Bhatia Mithali Raj  esakal
क्रीडा

ICC Women’s Rankings: स्मृती, यस्तिकाचे रँकिंग सुधारले; मितालीची घसरण

सकाळ डिजिटल टीम

भारतीय महिला क्रिकेट संघ (India Women's Cricket Team) सध्या न्यूझीलंडमध्ये महिला वनडे वर्ल्डकप खेळत आहे. नुकताच भारताने बांगलादेशचा 110 धावांनी पराभव करत सेमी फायनलची दावेदारी अजून बळकट केली. या सामन्यात भारताने 229 धावा केल्या होत्या. त्यात यस्तिका भाटियाने (Yastika Bhatia) अर्धशतकी (50) योगदान दिले होते. या खेळीचा फायदा तिला आयसीसी महिला वनडे खेळाडू रँकिंगमध्ये (ICC Women’s ODI Player Rankings) झाला. तिने आठ स्थानांची जंप घेत 39 व्या स्थान पटकावले. तर बांगलादेश विरूद्ध 30 सामन्यांची खेळी करणारी स्मृती मानधना (Smriti Mandhana) देखील एका स्थान वर सरकली असून ती आता 10 व्या स्थानावर पोहचली आहे.

स्मृती मानधाना आणि यस्तिका भाटिया यांनी रँकिंगमध्ये सुधारणा केली असली तरी भारताची कर्णधार मिताली राजला (Mithali Raj) कामगिरीत सातत्य राखण्यात आलेल्या अपयशाचा फटका बसला आहे. मिताली राजच्या रँकिंगमध्ये दोन आठवड्यापूर्वी 5 स्थानांची घसरण झाली होती. आता मितालीचे रँकिंग अजून एका स्थानाने घसरले आहे. ती आता न्यूझीलंडच्या एमी सेटर्थवेटबरोबर संयुक्तरित्या आठव्या स्थानावर पोहचली आहे. मिताली राजने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 68 धावांची खेळी केली होती. मात्र बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात ती शून्यावर बाद झाली. मितालीला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे.

आयसीसी महिला वनडे प्लेअर रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हेले ही 730 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर तिचीच संघ सहकारी बेथ मूनी 725 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. तिला वर्ल्डकपमध्ये गेल्या दोन सामन्यात 30 आणि नाबाद 28 धावांची खेळी केल्याने रँकिंगमध्ये दोन स्थानाचा फायदा झाला आहे. आता ती अव्वल स्थानावर असलेल्या हेलेला चांगलीच टक्कर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT