Harmanpreet Kaur sakal
क्रीडा

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरची पाचव्या स्थानावर झेप

महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान

सकाळ वृत्तसेवा

दुबई : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एका दीड शतकासह कमालीचा फॉर्म दाखवणारी महिला कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत चार गुणांची झेप घेत पाचवे स्थान मिळवले आहे. हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत ३-० असा व्हाईटवॉश देणाचा पराक्रम प्रथमच केला.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीने १११ चेंडूत नाबाद १४३ धावांची झंझावाती खेळी साकार केली होती. भारतीय कर्णधारासह सलामीवर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनीही क्रमवारीत प्रगती केली होती.

मानधना या अव्वल स्थानावर राहिलेली आहे. तिने या मालिकेत दोन सामन्यांत ४० आणि ५० अशा धावा केल्या. आता तिने एका गुणाची प्रगती केली, त्यामुळे ती सहाव्या स्थानावर आली आहे; तर लॉर्डसवर झालेल्या अखेरच्या सामन्यात नाबाद ६५ धावांची खेळी करणाऱ्या दीप्ती शर्माने आठ गुणांची झेप घेत २४ वे स्थान मिळवले आहे.भारतीय संघातील इतर खेळाडू पूजा वस्त्रकार (४९) आणि हर्लनी देओल (८१) यांच्यासह रेणुका सिंग (३५) यांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे.

निवृत्त होताना झुलन पाचव्या स्थानावर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील अखेरचा सामना खेळून आपल्या प्रदीर्घ करकिर्दीला पूर्णविराम देणारी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने पाचव्या स्थानावरून निरोप घेतला. कधी काळी ती अव्वल मानांकित गोलंदाज होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT