Women's T20 World Cup 2023 sakal
क्रीडा

WT20 WC 23: टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत दोन संघ पोहोचले! टीम इंडिया बाहेर? जाणून घ्या समीकरण

Kiran Mahanavar

Women's T20 World Cup 2023 : महिला टी-20 विश्वचषक 2023चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गट टप्पा संपत आला आहे, परंतु आतापर्यंत फक्त दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत.

महिलांच्या ट्रेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहावे विजेतेपद मिळवण्याच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या गट एकमध्ये झालेल्या आपल्या शेवटच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सहा गडी राखून पराभव करत, विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

ऑस्ट्रेलियानंतर उपांत्य फेरी गाठणारा इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे. इंग्लंडचा संघ ‘ब’ गटात आहे. टीम इंडियाही उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहे. आज भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना आयर्लंड विरुद्ध आहे.

हरमनप्रीत कौर अँड कंपनी हा सामना जिंकून इंग्लंडसोबत ग्रुप-बी मधून उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्याच सोबत भारत उपांत्य फेरी गाठणारा तिसरा संघ बनेल. जर आज आयर्लंडने भारताला मोठ्या अपसेटमध्ये पराभव केला. तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडतील.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 124 धावांपर्यंतच मजल मारू दिली. तझमिन ब्रिटस हिने दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वांत जास्त 45 धावा केल्या. जॉर्जिया वेअरहॅम हिने ऑस्ट्रेलियाकडून 18 धावा देत दोन बळी टिपले. दक्षिण आफ्रिकेकडून देण्यात आलेले 125 धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाकडून 16.3 षटकांमध्येच पूर्ण करण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडून ताहलिया मॅग्रा हिने 33 चेंडूंमध्ये 57 धावांची खेळी केली आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. मारिझॅन कॅप हिने दक्षिण आफ्रिकेतर्फे 21 धावा देत 2 बळी टिपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT