ICC Womens World Cup 2022 New Zealand Women vs India Women  Sakal
क्रीडा

Womens World Cup : हरमनप्रित एकटी पडली; भारतीय संघाचा पराभव

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेल्या 261 धावांचा पाठलाग करताना हरमनप्रित कौरनं अर्धशतकी खेळी केली. पण तिचे हे अर्धशतक व्यर्थ ठरले. यजमान न्यूझीलंड संघाने भारतीय महिला संघाला 198 धावांत रोखत 62 धावांनी विजय नोंदवला. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एमीनं (Amy Satterthwaite) 84 चेंडूत केलेल्या 75 धावा आणि अमेलया (Amelia Kerr) हिने 64 चेंडूत केलेल्या 50 धावांच्या जोरावर न्यूझीलंड महिला संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 260 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मिताली राजने 32 आणि हरमनप्रित कौर 71 धावा वगळता कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

यश्तिका भाटिया (Smriti Mandhana) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 10 धावा असताना स्मृतीच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. तिने 6 धावा करुन तंबूचा रस्ता धरला. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या दीप्तिलाही नावाला साजेसा खेळ करता आला नाही. ती 5 धावा करुन बाद झाली. सुरुवातीच्या पडझडीतून सावरुन कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि हरमनप्रितनं (Harmanpreet Kaur) संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अमेलयानं मितालीला बाद करत तिने कर्णधार-उपकर्णधार जोडी फोडली. या दोघींनी चौथ्या विकेट्ससाठी 47 धावांची खेळी केली.

मिताली बाद झाल्यानंतर हरमनप्रित कौरनं एका बाजूनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने एका मागून एक विकेट पडत राहिल्या. रिचाला खातेही उघडता आले नाही. स्नेह राणा 18 (28) आणि पुजा वस्त्राकर 6 (16) स्वस्तात माघारी फिरल्या. हरमनप्रित कौरनं 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 63 चेंडूत 71 धावांची खेळी केली. तिच्या या खेळीशिवाय भारतीय संघातील अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT