2022 Pakistan Women Beat West Indies Women  Sakal
क्रीडा

CWC 2022 : पाक जिंकले; भारताचा सेमीसाठी पेपर झाला सोपा

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 : पाकिस्तान महिला संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. सलग चार पराभवानंतर पाचव्या सामन्यात पाक महिलांनी वेस्ट इंडीज महिला संघाला 8 विकेट्सनी पराभूत केले. या पराभवामुळे गुणतालिकेतील समीकरणं बदली आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज (West Indies Women) यांच्यातील सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळवण्यात आला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडिज महिला संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 89 धावा केल्या होत्या.

पाकिस्तान महिला संघाने (Pakistan Women) दोन विकेट्सच्या मोबदल्यात 90 धावा करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानकडून मुनीबा अली हिने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. अमीन 8 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बिस्माह मारुफ 20 आणि ओमैमा सोहेल हिने 22 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सुरुवातीलाच चार सामने गमावल्यामुळे पाकिस्तान महिला संघाच्या वर्ल्ड कप सेमीमध्ये पोहचण्याच्या मार्ग जवळपास संपुष्टात आला आहे. दुसरीकडे आता वेस्ट इंडीज महिलाही जरतरच्या गणितात अडकण्याची शक्यता निर्माण झालीये. पाकिस्तानी महिला संघाच्या पहिल्या विजय हा भारतीय महिला संघाला (India Women) मोठा दिलासा देणारा आहे.

पाकिस्तानचा विजय भारताला फायदेशीर कसा

पाकिस्तानने वेस्ट इंडीज संघाला पराभूत करत आपले खाते 2 अंकानी उघडले. दुसरीकडे वेस्ट इंडीज 6 सामन्यातील 3 विजयासह 6 गुणांनी तिसऱ्या स्थानावर कायम राहिला. आता वेस्ट इंडीज संघाने शेवटचा सामना जिंकला तरी त्यांना 8 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. त्यांचा पुढचा सामना स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघासोबत असेल. त्यामुळे आता वेस्ट इंडीज संघाला जर तर समीकरणात अडकण्याची भीती निर्माण झालीये. त्यांनी जर हा सामना गमावला तर ते 6 गुणांवरच राहितील. ही परिस्थिती भारतीय महिला संघाला सेमी फायनलचा मार्ग सुकर करणारी अशीच आहे.

पाकिस्तान महिला संघ गुणतालिकेतील गुंता वाढवणार?

एवढेच नाही पाकिस्तानचा संघ पुढील दोन सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत मोठा गुंता निर्माण करु शकतो. भारतीय संघासाठी बांगलादेश विरुद्धचा सामना सहज आणि सोपा आहे. हा सामना जिंकला तर भारतीय महिला संघ प्लस रनरेटच्या जोरावर 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहचेल. भारतीय संघाने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे सेमी फायनलचे तिकीट पक्के होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीच्या विद्यार्थ्याचा शिक्षकांकडून छळ… दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं! शेवटचं वाक्य अंगावर काटा आणणारं

Latest Marathi News Update LIVE : जळगावमध्ये शिवारात 23 लाखांची 'गांजाची शेती' केली उद्ध्वस्त

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Amravati Crime: अमरावती हादरली! युवकाची पूर्ववैमनस्यातून हत्या

Bicycle Riding: 'सोलापूरच्या चौघांनी के२के सायकल रायडिंगमध्ये रचला इतिहास'; काश्मीर ते कन्याकुमारी १६ दिवसांमध्ये ४२०० किमी प्रवास पूर्ण..

SCROLL FOR NEXT