ICC Womens World Cup 2022 . IND vs PAK  Sakal
क्रीडा

ICC Womens World Cup : पाक विरुद्ध स्मृतीची संयमी फिफ्टी; पण...

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 . IND vs PAK : महिला वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूझीलंडमधील माउंट माउंगानुई मैदानात सुरु आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या लढतीत भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शफाली वर्मा (Shafali Verma)बाद झाली. डायनाने तिला खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि दीप्ती शर्मा (Smriti Mandhana) या दोघींनी भारतीय संघाचा डाव सावरला.

त्यांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 96 धावांची खेळी केली. स्मृतीने संयमी खेळी करताना 75 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. वनडे कारकिर्दीतील तिचे हे 25 वे अर्धशतक आहे. दुसऱ्या बाजूला दीप्ती शर्मानं (Deepti Sharma) 57 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 40 धावा केल्या. या दोघींनी दमदार खेळी केली असली तरी कर्णधार मितालीसह हरमनप्रीत स्वस्तात माघारी परतल्या, त्यामुळे भारतीय संघाचा निम्मा संघ दिडशेच्या आतच तंबूत परतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT