ICC Womens World Cup 2022 Sakal
क्रीडा

VIDEO : कॅरेबियन छोरीचा अफलातून कॅच; जॉन्टीही होईल आवाक्

सकाळ डिजिटल टीम

ICC Womens World Cup 2022 : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सातव्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने तगड्या इंग्लंड महिला संघाला 7 धावांनी पराभूत केले. या विजयासह वेस्ट इंडीज महिला संघ सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. इंग्लंड महिलांचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव असून त्यांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न आता निर्माण झाला. वेस्ट इंडीज महिला संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 225 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाचा डाव 218 धावांत आटोपला.

धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाने सावध सुरुवात केली. पण धावफलकावर 31 धावा असताना शमिला कोन्नेल (Shamilia Connell ) हिने इंग्लंडला पहिला धक्का दिला. इंग्लंडची सलामीची बॅटर लॉरेन विनफिल्ड हिल (Lauren Winfield Hill) ही अवघ्या 12 धावाची भर घालून तंबूत परतली. ही विकेट शमिलाच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याचे खरे श्रेय जाते ते डोट्टीन हिच्या चपळ क्षेत्ररक्षणाला. विनफिल्ड हिलनं शॉर्ट अँण्ड ऑफ लेंथ चेंडू बॅकवर्ल्ड पाँइंटच्या दिशेने फटकावला होता.

डाव्या बाजूला अप्रतिम उडी मारून डेंड्रा डोट्टीन (Deandra Dottin) हिने एका हातात जबरदस्त झेल टिपला. क्रिकेटच्या मैदानातील अप्रतिम क्षेत्ररक्षणाने क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर जॉन्टी ऱ्होड्सही हा झेल बघून आवाक् होईल, असाच अफलातून कॅच तिने टिपला. अनेकांना हा झेल पाहिल्यावर जॉन्टीच्या फिल्डिंगचीही आठवण येईल.

वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीज संघाने यजमान न्यूझीलंड संघाला 3 धावांनी पराभूत केले होते. इंग्लंडला पराभूत करत त्यांनी स्पर्धेत उलटफेर करण्यासाठी सज्ज आहोत, याचे संकेतच दिले आहेत. दुसऱ्या बाजूला इंग्लंड महिलांना पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता. या पराभवामुळे स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT