Gautam Gambhir sakal
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी दिग्गज गौतम गंभीरने केली भारतीय संघाची निवड! श्रेयस अय्यर वगळले तर...

Kiran Mahanavar

World Cup Squad Team India : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023ची उलटी गिनती सुरू झाली आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, याआधी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपला आवडता भारतीय संघ निवडला होता. आशिया कपसाठी भारतीय संघात 17 खेळाडूंची निवड करण्यात आली होती आणि संजू सॅमसनला बॅकअप यष्टिरक्षक म्हणून श्रीलंकेला पाठवण्यात आले होते, मात्र वर्ल्ड कपसाठी केवळ 15 खेळाडूंची निवड केली जाईल.

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर भारताचा वर्ल्ड कप संघ निवडला आणि त्याने ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरचा आपल्या संघात समावेश केला. तमिळनाडूच्या या क्रिकेटपटूची आशिया कप 2023 साठी भारतीय संघात निवड झाली नाही.

गंभीरने आपल्या संघात श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि शार्दुल ठाकूरची निवड केली नाही. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांची आशिया कप 2023 साठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन गंभीरने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या चार वेगवान गोलंदाजांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांची निवड केली आहे. त्याने केएल राहुल आणि इशान किशन यांना संघात यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून निवडले.

युझवेंद्र चहलला आपल्या संघात स्थान दिले नाही. फलंदाजीत सखोलतेसाठी त्याने रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात फिरकी अष्टपैलू म्हणून स्थान दिले. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून त्याने हार्दिक पांड्याला आपल्या संघात ठेवले.

गौतम गंभीरचा भारताचा एकदिवसीय वर्ल्ड कप संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह. मोहम्मद शमी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT