World Cup 2023 Points Table After Ind vs Aus Match 5 
क्रीडा

World Cup 2023 Points Table : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवूनही पॉइंट टेबलमध्ये भारत पाकिस्तानच्या मागे

Kiran Mahanavar

World Cup 2023 Points Table After Ind vs Aus Match 5 : एमए चिदंबरम चेन्नई येथे रविवारी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्डकप 2023 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताचे गुणांचे खाते उघडले. मात्र, गुणतालिकेत भारताला फारसा फायदा झालेला नाही. पहिले 5 सामने जिंकलेल्या सर्व संघांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड अव्वल तर भारत पाचव्या स्थानावर

ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळवणारा भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताचा रनरेट इतर चार संघांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकल्यानंतर भारताचा रनरेट +0.883 आहे. विराट कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला असता तर कदाचित चित्र वेगळे पाहायला मिळाले असते.

इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या सामन्यानंतर न्यूझीलंड अव्वल आहे. इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. त्याचा रनरेट +2.149 आहे.

तर श्रीलंकेवर 102 धावांनी विजय मिळवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ +2.040 च्या रनरेटने दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या सामन्यानंतर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका असे संघ आहेत ज्यांचा रनरेट दोनच्या वर आहे. नेदरलँड्सचा 81 धावांनी पराभव करून पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशने अफगाणिस्तानला 6 गडी राखून पराभूत करून चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT