World Cup 2023 schedule sakal
क्रीडा

World Cup 2023 schedule: डे-नाईटच्या सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या काय आहे टायमिंग

Kiran Mahanavar

World Cup 2023 schedule : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. आयसीसीने मंगळवारी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले.

भारतातील 10 शहरांमध्ये 46 दिवस एकूण 48 सामने खेळले जातील. आता सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. दिवसाचे सामने सकाळी 10:30 वाजता, तर दिवस-रात्रीचे सामने दुपारी 2 वाजता होणार आहेत.

शनिवारी डबलहेडर असतील आणि रविवारी दर आठवड्याला एक सामना पाहायला मिळेल, अंतिम लीग स्टेजचे सामने वगळता जेथे डबलहेडर रविवारी खेळले जातील आणि शनिवारी फक्त एकच सामना असेल.

अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होईल तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्र असणार आहे. साधारणपणे भारतात दुपारी अडीच वाजल्यापासून डे नाईटचे सामने खेळवले जातात, मात्र जेव्हा विश्वचषकाचे सामने खेळवले जातील, तेव्हापासूनच भारतात थंडी सुरू होईल. अशा परिस्थितीत डे नाईटचे सामने अर्धा तास आधी म्हणजेच 2 वाजल्यापासून खेळले जातील. यजमान भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे 5 वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवस

विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडल्यास सामना राखीव दिवशी आयोजित केला जाईल. आयसीसीने तिन्ही महत्त्वाच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबरला होईल तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील.

बीसीसीआयने पाकिस्तानची मागणी लावली फेटाळून

भारताविरुद्ध चेन्नई, बंगळुरू किंवा कोलकाता येथे सामना घेण्याची मागणी पाकिस्तानने केली होती, जी बीसीसीआय आणि आयसीसीने फेटाळून लावली होती. या विश्वचषकात 10 संघ सहभागी होतील, त्यापैकी 8 संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगद्वारे पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन संघ झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या क्वालिफायर स्पर्धेत पोहोचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Pune News: मांढरदेवीच्या यात्रेला अभूतपूर्व गर्दी; भोर मार्गावर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, दाेन्ही बाजुला वाहतूक जाम!

Ankita Bhandari Murder : काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरण? मुख्यमंत्र्यांनी दिले CBI चौकशीचे आदेश; जुन्या जखमा आणि नवा वाद!

Rhino Attacks Tiger : वाघाच्या जबड्यातून पिल्लाची सुटका! दुधवा जंगलात गेंड्याच्या मादीचा वाघावर थरारक हल्ला; दुर्मिळ दृश्य video viral!

Black Saree Look: काळ्या साडीतला बॉलिवूड टच देईल तुम्हाला एलिगंट अन् रॉयल लूक, कौतुक नक्की मिळेल!

SCROLL FOR NEXT