icc world cup 2023 Strategy for playing Indian spin bowling Pat Cummins Australia players ready Sakal
क्रीडा

World Cup 2023 : भारतीय फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी व्यूहरचना; पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सज्ज

भारताविरुद्धच्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात राजकोट येथे ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला

सकाळ वृत्तसेवा

चेन्नई : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची व्यूहरचना सज्ज असल्याची माहिती कांगारूंच्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने गुरुवारी दिली. साऱ्यांचे लक्ष असलेला भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रविवारी (ता. ८) चेन्नईत खेळला जाईल.

भारताविरुद्धच्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात राजकोट येथे ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला. त्या कामगिरीने संघाला खूपच आत्मविश्वास प्राप्त झाल्याचेही कमिन्सने नमूद केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ फरकाने जिंकली. राजकोट येथील लढतीत पाहुण्या संघाने ३५२ धावांचा डोंगर उभारताना सामना ६६ धावांनी जिंकला होता.

‘‘सामन्यापूर्वी काही दिवस अगोदर तयारी सुरू होती. ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप फिरकी गोलंदाजी खेळले आहेत. आमचे फलंदाज भारतात पुष्कळ खेळले असून चांगली कामगिरीही केलेली आहे. त्यामुळे बहुतेक भारतीय गोलंदाजांची त्यांना ओळख असून ठरल्यानुसार व्यूहरचना आहे,’’ असे कमिन्स म्हणाला.

‘‘आम्ही खरोखरच आत्मविश्वासाने भारलेलो आहोत. राजकोटमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजय आमच्यासाठी लाभदायक ठरला. त्या लढती खेळलेला आमचा संघ बलवान मानता येईल. भारतात खेळलेल्या एकदिवसीय लढतीतील आमची कामगिरीही खूपच चांगली आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पुढे म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT