World Cup 2023 sakal
क्रीडा

World Cup 2023 : ICC वर्ल्ड कपवरुन रोहित पवार राष्ट्रवादीच्या 'त्या' बड्या नेत्याशी भिडले

वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सामन्याची ठिकाणे निवडताना राजकारण झाल्याची टीका सातत्याने होत आहे...

Kiran Mahanavar

Rohit Pawar vs Anil Deshmukh : आयसीसीने 27 जून रोजी वनडे विश्वचषक 2023 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यंदाचा वर्ल्डकप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान 10 संघांमध्ये 48 सामने खेळल्या जाणार आहेत. जवळपास दीड महिने भारत क्रिकेटचा कुंभमेळा चालणार आहे. दरम्यान, राज्यात या स्पर्धेवरुन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यामध्ये मतभेच झाल्याची चर्चा क्रिकेटसह राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भारतातील 12 ठिकाणी हे सामने होणार आहेत. आयसीसी विश्वचषक 2023 चे सर्व सामने चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरम, मुंबई, अहमदाबाद, पुणे, लखनौ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील. मात्र जेव्हापासून वेळापत्रक जाहीर झाले तेव्हापासून सामन्याची ठिकाणे निवडताना राजकारण झाल्याची टीका सातत्याने होत आहे.

पंजाबच्या क्रीडामंत्र्यांनी पंजाबला एकही सामना मिळाला नाही म्हणून टीका केली, तर त्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट बीसीसीआय सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. नागपूरला एकही सामना न दिल्याबद्दल विदर्भाची नाराजी पत्राद्वारे यांनी कळवली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अनिल देशमुख यांच्या मागणीवर उत्तर दिले आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले, साहेब आपण विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी #ICC च्या निकषाप्रमाणे ६ किंवा ८ ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत. पण आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात प्रत्यक्ष १० ठिकाणी सामने तर २ ठिकाणी सराव असे एकूण १२ ठिकाणी सामने होणार आहेत.

रोहित पवार पुढे म्हणाले, देशातील स्टेडियमच्या संख्येचा विचार करता काही राज्यांवर नक्कीच अन्याय झाला असेल पण महाराष्ट्रात सर्वाधिक सामने होणार असल्याने याबाबत मी #BCCI आणि #ICC चे महाराष्ट्राच्यावतीने आभारही मानले आहेत. हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र येणार असून आपणही जरुर या!

पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंग यांनी बीसीसीआयने वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टीका केली होती. मोहालीला वर्ल्डकपमधील एकही सामना न देण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला. यावर विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये कोणतेही राजकारण होत नाही किंवा राजकीय हस्तक्षेप झालेला नाही, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT