jasprit bumrah And sanjana ganesan  twitter
क्रीडा

WTC Final 2021 : संजना-बुमराहच्या मुलाखतीवर कमेंटची 'बरसात'

आयसीसीने या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय.

सुशांत जाधव

ICC World Test Championship Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणलाय. ओपनिंग डे दिवशीच्या साउदम्टनमधील पावसाच्या बॅटिंग प्रमाणेच आणखी एका विषयाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघातील जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांचीही जोरदार चर्चा सुरु आहे. संजनाने सामन्यापूर्वी बुमराहची मुलाखत घेतली. आयसीसीने या मुलाखतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. या मुलाखतीवेळी संजनाने जसप्रीतला अनेक प्रश्नांचा भडीमार केला. (Jasprit Bumrah Face interview Wife And Sports Anchor Sanjana Ganesan before ICC WTC Final Match)

मुलाखतीसाठी संजनासमोर आल्यानंतर बुमराहने यॉर्कर चेंडूचा वापर करावा तसा शब्दाचा मारा केला. मी तूला कुठेतरी पाहिलय? असा प्रश्न त्यान संजनाला विचारला. संजनाने यावर स्मित हास्य करत मुलाखतीला सुरुवात केली. अनेक प्रश्न विचारताना बुमराहच्या यॉर्करला तिने आपल्या शैलीत उत्तर दिले. मुलाखतीमध्ये आपल्या लग्नाचा अल्बमच संजनाने बाहेर काढला. लग्नाचा दिवस माझ्या आयुष्यात सर्वात खास होता, असे सांगताना बुमराह लाजताना पाहायला मिळाले. आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंटची 'बरसात' होताना दिसते.

जसप्रित बुमराहने काही दिवसांपूर्वी संजनासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर संजनाने बुमराहला प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले. यावर बुमराह म्हणाला की, कॅप्शनसाठी मी खूप विचार केला. पण शेवटी तुच फोटोला कॅप्शन सुचवले होतेस, असे त्याने सांगितले. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून सुट्टी घेत बुमराहने लग्न आटोपले होते. गोव्यामध्ये या दोघांनी मोजक्या मंडळीच्या साक्षीने एकमेकांसोबत नव्या इनिंगला सुरुवात केली. लग्नानंतर काही दिवसांतच दोघेही आपल्या आपल्या कामावर परतली होती. जसप्रित बुमराह मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर दुसरीकडे आयपीएवेळी संजनाही अँकरिंग करताना पाहायला मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT