ICC World Test Championship Points Table
ICC World Test Championship Points Table 
क्रीडा

WTC Points Table: कांगारू फर्स्ट-क्लास! फायनली टीम इंडियाचा पेपरही सोपा; जाणून घ्या समीकरण

Kiran Mahanavar

ICC World Test Championship Points Table : ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 182 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा आपला दावा आणखी मजबूत केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियालाही या सामन्याचा फायदा झाला आहे. वास्तविक,

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवाचा फायदा भारताला झाला आहे. आता टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर राहून सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सहज खेळू शकते. टीम इंडियाने अलीकडेच बांगलादेशवर 2-0 असा विजय नोंदवून होता.

दक्षिण आफ्रिका 54.55 टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर होता, मात्र ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या दारुण पराभवानंतर ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत. दक्षिण आफ्रिकेला आता 50 टक्के गुण मिळाले आहेत. त्याचवेळी श्रीलंका 53.33 टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारत 58.93 टक्के गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 78.57 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. आस्‍ट्रेलिया फायनलमध्‍ये पाऊल ठेवण्‍याच्‍या अगदी जवळ आहे, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दुस-या संघासाठी युद्ध सुरू आहे.

भारतासाठी फायनलचे समीकरण काय आहे ?

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने 4-0 असा विजय मिळवला तर भारत सहज पोहोचेल. या स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा बाहेर जाईल. हे दोन्ही संघ आपले उर्वरित सामने जिंकूनही अंतिम फेरीत जाऊ शकणार नाहीत.

  • भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-0 ने पराभव केला तरी भारत सहज अंतिम फेरीत जाऊ शकतो.

  • चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाली किंवा मालिका अनिर्णित राहिली, तर भारतासाठी कठीण होईल. या स्थितीत श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आपले उर्वरित सामने जिंकून भारताला मागे टाकू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT